शिंदे-आंबेडकरांची भेट संजय राऊतांना अमान्य ? म्हणाले...

    12-Jan-2023
Total Views |
 
 संजय राऊत
शिंदे-आंबेडकरांची भेट राऊतांना अमान्य ? म्हणाले...
 
मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांच्यात झालेल्या गुप्त बैठकीनंतर राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. दरम्यान, यावर अनेक तर्कवितर्क लढवले जात आहेत. ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी आता यावर प्रतिक्रिया दिली आहे. "प्रकाश आंबेडकर-शिंदे भेटले त्यात छुपं काय? तुम्हाला भेटीबाबत कळलं म्हणजे छुपं काय?" अशी प्रतिक्रिया त्यांनी माध्यमांना दिली.
 
 
राऊत म्हणाले, "छुपं काही नव्हतं. मी दिल्लीत होतो. प्रकाश आंबेडकर यांची माझीही भेट झाली. त्यात छुपं काय? प्रकाश आंबेडकर-शिंदे भेटले त्यात छुपं काय? तुम्हाला भेटीबाबत कळलं म्हणजे छुपं काय? तुम्हाला त्या भेटीची माहिती मिळाली, याचाच अर्थ ती भेट गुप्त नव्हती." राउतांनी दिलेल्या या प्रतिक्रियेवरून शिंदे-आंबेडकरांची भेट त्यांना अमान्य होती का? असा प्रश्न उपस्थित होत आहे.
 
 
यानंतर त्यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेत सामील होणार असल्याचं सांगितलं. "मी ही भारत जोडो यात्रेत सामील होणार आहे. जम्मूमधून मी या यात्रेत सामील होईल. ही यात्रा महाराष्ट्रात आली तेव्हा मला यात्रेत जाता आलं नव्हतं. पण आदित्य ठाकरे यात्रेत सामील झाले होते. आता मी ही सामील होणार आहे. गांधी-नेहरु घराण्यातील एक तरुण हजारो किलोमीटर पायी चालत आहे. देशात सद्भावना निर्माण करण्यासाठी ते जात आहेत. देशासाठी सर्वोच्च बलिदान देणाऱ्या घराण्यातील हा तरुण आहे. त्याचं स्वागत देशाच्या पंतप्रधानांनीही केलं पाहिजे." असं राऊत म्हणाले.
 
 
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.