अभिजित पानसे हे एक बिनधास्त व्यक्तीमत्व. त्यांची स्वतःची अशी रोकठोक मत आहेत. गेली अनेकवर्ष राजकारणात सक्रीय असलेल्या पानसेंमध्ये एक संवेदनशील कलाकार दडलाय. रेगे, ठाकरे, रानबाजार अशा अनेक कलाकृतींच्या माध्यमातून त्यांच्यात लपलेल्या कलाकाराने आपल्याशी अप्रत्यक्ष संवाद साधला, आपल्याला विचार करायला भाग पडलं. म्हणूनच एक प्रयोगशील लेखक, काही तरी हटके, वेगळं आणि ठासून मांडणी करणारा दिग्दर्शक व अभिनेता अभिजित पानसे रान बाजारच्या निमित्ताने मुलाखतीच्या माध्यमातून संवाद साधला.
रान बाजार ही मराठीत तुफान गाजलेली वेबसिरीज तुम्हाला कशी सुचली ?
कोरोना काळ हा अनेकांसाठी वेदनादायक असलेला काळ पण असे असले तरी तेव्हा मला खूप वेळ मिळाला त्यावेळी प्रचंड वाचन करता आले. रान बाजार ही दोन-तीन वर्षांपूर्वी मला सुचलेली कल्पना आहे. मी नेहमीच मला जे म्हणायचय ते ठासून किंवा ठोकून म्हणतो त्यात कोणताही आडपडदा नसतो. राजकारणावर एखादी सशक्त सिरीज करण्याची कल्पना गेले काही वर्ष माझ्या डोक्यात घोळत होती.
नेमकं तेव्हाच माझा मित्र अक्षय बर्दापूरकर याने प्लानेट मराठी हे जगातील पाहिलं मराठी ओटीटी सुरु केलं. एक सामान्य मराठी कुटुंबातल्या अक्षयने शंबर कोटींच व्ह्याल्यूएशन असलेली मराठी ओटीटी कंपनी उभी केली, या गोष्टीचं मला खूपच कौतुक वाटलं. त्यानंतर अक्षय आणि माझं बोलण झालं त्याने मला प्लानेट मराठीसाठी काही तरी करण्याबद्दल सुचवलं. कलाकृती बनवताना मी कधीही कोणत्याही प्रकारचे कॉम्प्रोमाईज करत नाही. त्यामुळे माझ्या कलाकृतीचे बजेट थोडं जास्त असतं. त्याबद्दल अक्षय आणि माझे बोलणे झाले, त्यावर त्याने गो अहेड असा सिग्नल दिला आणि रानबाजार प्रत्यक्षात आली.
रान बाजारला प्रेक्षकांनी अक्षरशः डोक्यावर उचलून घेतलं. ही वेबसिरीज खूप गाजली, अजूनही गाजतीये. रान बाजारच्या यशाचंं कारण काय? आणि मराठीतला जॉनर एकाच चौकटीत अडकलाय कि तो चौकट मोडून बाहेर पडतोय? एक लेखक,दिग्दर्शक म्हणून तुम्हाला काय वाटत?
नक्कीच चौकात मोडायला हवी. कारण करोनामुळे प्रेक्षक मोठ्याप्रमाणावर ओटीटीकडे वळला आणि जगभरातील सर्वोकृष्ठ कथा,पटकथा किंवा कॉन्टेट तो बघायला लागला. त्यामुळे आपली स्पर्धा जगभारतील कॉन्टेटशी सुरु झालेली आहे. त्यामुळे दर्जा सांभाळण्या खेरीज प्रेक्षकांची अभिरुची वायडर झालीये, अशा वेळी आपण तेच तेच करत बसलात तर त्याचा फटका नक्कीच बसेल. आज मोठ मोठ्या स्टार्सच्या फिल्म्स फ्लॉप होत आहेत.
याचा बॉयकॉट ट्रेंडशी संबंध नसून लोकांच्या खिशात पैसा नाही, ही वस्तुस्थिती आहे.दुसरी गोष्ट आताच्या ग्लोबल कॉन्टेटशी तुम्हाला स्पर्धा करता येत नाहीये, हे प्रमुख कारण आहे. आता प्रेक्षकांना ओल्ड स्कूल नकोय. त्यामुळे कलाकृती करताना काही बदल करायला हवेत, नाही तर प्रेक्षक तुम्हाला नाकारतील.
रान बाजारचा विषय अत्यंत भन्नाट आहे. पण सुरुवातीला रान बाजार हे नाव ऐकून सगळेच चकित झाले होते. त्यामुळे ही सिरीजसुद्धा वन टेक वन शोर्ट ओके झालीये का? नेमकी काय आहे या पाठीमागची गंमत?
मेकर म्हणून मला नेहमीच वेगवेगळे प्रयोग करायला आवडतात. सिनेमा बनवताना क्राफ्टींगला खूप महत्व असत. कॅमेरा सगळीकडून हिंडत असतो. सीनच्या दृष्टीने आवश्यक असलेल्या गोष्टी, त्या त्या वेळेला फ्रेममध्ये येणं गरजेच्या असतात. त्यावेळी कलाकारांचे डायलॉग आणि इतर गोष्टींच्या टायमिंगला फारच महत्व असतं. या सगळ्यात डीओपीची भूमिका खूप महत्वाची ठरते. दिग्दर्शकाला व्हीजुअली नेमकं काय दाखवायच आहे, काय मांडायचं आहे, हे समजून काम करावे लागते.
कॅमेराची भाषा असते. कोणताही शोर्ट घेताना कॅमेरा कुठे ठेवायचा ? कोणता अँगल लावायचा? याचे काही लॉजिक्स असतात. ज्यांना फिल्ममधल्या टेक्निकल गोष्टींमधलं कळतं अशा अनेकांनी रानबाजार पाहून मला फोन केला आणि त्याबद्दल माझं कौतुक केलं. पण यासगळ्यात मला रान बाजारचे डीओपी संदीप यादव यांच्या नावाचा विशेष उल्लेख करावासा वाटतो. कारण मला काय व्हिजुअल्स हवेत आणि सीनला कोणती गोष्ट गरजेची आहे हे बरोबर हेरून त्यांनी कॅमेरा बोलता केला. म्हणूनच ही सिरीज पाहताना आपल्या समोरच गोष्टी घडत आहेत, असा फील येतो.
या सिरीजच्या माध्यमातून तुम्ही मराठीतील दिग्गज मंडळींना एकत्र करून काम केलंत, कसा होता अनुभव?
मी स्वतःला भाग्यवान समजतो मी या लोकांसोबत काम करू शकलो. अनंत जोग, डॉ.मोहन आगाशे, मोहन जोशी, मकरंद अनासपुरे,सचिन खेडेकर ही सगळी मंडळी म्हणजे अक्टींग स्कूल आहेत. आपल्याला डॉ. मोहन आगाशें सोबत काम करायला मिळतंय या गोष्टीने मला भरून यायचं. मी कधीही कास्टिंग करताना एखादी व्यक्ती स्टार आहे किंवा नाही याचा विचार करत नाही. तर त्या कॅरेक्टरला कोण जातंय किंवा नाही याचा विचार करतो. रान बाजार करताना ही सगळी मंडळी मला त्या कॅरेक्टरमध्ये दिसली म्हणून त्याचं कास्टिंग केले.
सिरीज आणि सिरीजचा ट्रेलर यात खूपच फरक होता. त्यामुळे प्रेक्षकांच्या प्रतीक्रीयांबद्दल काय सांगाल?
जेव्हा जागात सत्तांतर होत असताना सामान्य माणूस नग्न होतो किंवा कोणी तरी त्याच्यावर अत्याचार होत असतो. टीजरच्या माध्यमातून ही ग्लोबल फिलोसॉफी मांडण्याचा माझा प्रयत्न होता. काही लोकांनी त्याचा योग्य अर्थ लावला काही लोकांनी चुकीचा. त्यातून प्राजक्ता माळी आणि तेजस्विनी पंडित या दोघींना ट्रोल केलं गेलं. ट्रोलींग ही एक विकृती आहे. त्यात अठ्यांणव टक्के ट्रोलर्स हे खोट्या नावाने वावरतात. त्यामुळे मी शक्यतो दुर्लक्ष करतो. पण त्या दोघींना घाणेरड्या भाषेत ट्रोल केल्याचं मला वाईट वाटलं. माझ्यावर तुकाराम, मर्ढेकर, नामदेव ढासळ यांच्या सारख्या कवींचे विद्रोही संस्कार झालेत. त्यामुळे माझ्या चित्रपटात मी विद्रोही दृष्टीने व्यक्त होतो.
बॉयकॉट ट्रेंड बद्दल तुम्हाला काय वाटतंं -
एखाद्याने अर्वाच्च किंवा अतोशोक्तीने भावनिक गोष्टींबद्दल टीका केल्यास समजू शकतो. पण कोणी पाच वर्षांपूर्वी काही म्हंटल म्हणून त्याला बॉयकॉट कारण चुकीचे आहे. अशा गोष्टींमुळे सजग कालाकृतीची निर्मिती होऊ शकत नाही. इतकेच नाही तर स्वतःला मनःशांती सुद्धा मिळणार नाही. सतत चीढल्याने तुमची प्रगती होणार नाही. त्यामुळे मी आमीर खानचे समर्थन करतो. पाणी फौंडेशन सारखा विषय त्याने हाताळलेला आहे. त्याच बरोबर 'तारे जमीन पें', 'रंग दे बसंती' अशा सजग कलाकृती त्यानेच निर्माण केलेल्या आहेत. ठीके भूतकाळात त्याच्याकडून एखादी चूक झाली असेल म्हणून त्याच्या चांगल्या गोष्टींकडे दुर्लक्ष करायचे का? त्याच्या निर्मितीवर बंदी घालणार का? अशाने साहित्य आणि संस्कृती संपेल.
याही पुढे जाऊन मला एक गोष्ट सांगावीशी वाटते ती म्हणजे महाराष्ट्रातील विचारवंतानी आडनाव लावू नये अशी चळवळ सुरु करावी. कारण आपल्याकडे नाव आणि आडनाव म्हणून समीक्षा केली जाते. म्हणूनच मला माझ्या पुढच्या कलाकृतीला स्वतःचे आडनाव लावू नये असा विचार मनात येतो.
शेवटचा प्रश्न रान बाजार २ आम्हाला बघायला मिळेल कि नाही?
नक्कीच रान बाजारचा पुढचा भाग निश्चितचं येणार आहे. पण त्यासाठी अजून एक वर्ष वाट पहावी लागेल. कारण सीजन वन पूर्ण झाल्यानंतर मी पुढच्या भागाची रूपरेषा लिहून ठेवली होती. पण जो पर्यंत पेपरवर फिल्म उतरत नाही तोपर्यंत हातात कॅमेरा घेऊ नये, असे माझे सूत्र आहे. त्यामुळे माझे काही प्रोजेक्ट पेंडिंग आहेत. ते लवकरच पूर्ण होतील आणि मग मी रान बाजारच्या दुसऱ्या सीजनकडे वळीन. त्यामुळे २०२३ मध्ये रान बाजारचा दुसरा भाग प्रेक्षकांना पाहायला मिळण्याची शक्यता आहे.