कोण कोणाच्या पाठीत खुपसणार खंजीर?

    03-Aug-2022
Total Views | 52
 
 
webseries
 
 
मुंबई : 'रानबाजार'च्या तुफान यशानंतर प्लॅनेट मराठीवर, अरविंद जगताप दिग्दर्शित ‘मी पुन्हा येईन’ वेबसिरिजचे तीन एपिसोड्स नुकतेच ‘प्लॅनेट मराठी ओटीटी’वर रिलीज झाले आहेत. यात सत्तेसाठी सत्ताधाऱ्यांचे, विरोधकांचे एकमेकांवरील आरोप, आमदारांची पळवापळवी, रिसॅार्ट पॅालिटिक्स पाहायला मिळत आहे. पहिल्या तीन एपिसोड्स पाहिल्यानंतर आता प्रेक्षकांना उत्सुकता लागून राहिली आहे ती पुढील एपिसोड्सची. त्यामुळे लवकरच आता पुढील भागही ५ ऑगस्टपासून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत.
 
 
 
सत्तास्थापनेसाठी सत्ताधारी विरोधी पक्षनेते कशाप्रकारे अपक्ष आमदारांची पळवापळवी करतात, हे पुढील भागांमध्ये बघायला मिळणार आहे. वसंतराव मुरकुटेंनी विधानसभेच्या निवडणुकीचा निकाल लागताच आमदारांची पळवापळवी सुरू केली. रिसॅार्टवरूनही आमदारांना कसे फोडतात, अपक्ष आमदार विनायक दिवटेंच्या गटात कसे सामील होतात? कोण कोणाच्या पाठीत ‘खंजीर’ खुपसणार, कोणता गट सत्तेसाठी ‘पलटी’ मारणार, या आणि अशा अनेक प्रश्नांची उत्तरे प्रेक्षकांना लवकरच मिळणार आहेत.
 
 
 
 
प्लॅनेट मराठीचे प्रमुख अक्षय बर्दापूरकर म्हणतात, “रानबाजार नंतर याही वेबसिरीजलाही प्रेक्षकांचा प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. सोशल मीडियावरून प्रेक्षकांच्या प्रतिक्रिया सकारात्मक येत आहेत तर पुढील भागही लवकर प्रदर्शित करा, अशी प्रेक्षक मागणी करत आहे. राजकारणामागील सत्य अतिशय व्यंगात्मक, उपरोधिक स्वरूपात दाखवले आहे. ‘मी पुन्हा येईन’ हा वेबसिरीज प्रेक्षकांना विचार करायला लावणारी आहे. पहिल्या तीन भागांनी प्रेक्षकांची उत्सुकता वाढवल्यानंतर आता लवकरच पुढचे भाग प्रेक्षकांच्या भेटीला घेऊन येत आहोत.’’
 
 
 
 
‘मी पुन्हा येईन’चे निर्माते प्लॅनेट मराठी, गौतम कोळी व जेम क्रिएशन्सने असून या वेबसीरिज मध्ये सयाजी शिंदे, उपेंद्र लिमये, सिद्धार्थ जाधव, रुचिता जाधव, भारत गणेशपुरे यांच्या प्रमुख भूमिका आहेत.
अग्रलेख
जरुर वाचा
‘द रूट्स ओपन माईक’च्या दोन यशस्वी वर्षांचा सांस्कृतिक उत्सव!

‘द रूट्स ओपन माईक’च्या दोन यशस्वी वर्षांचा सांस्कृतिक उत्सव!

‘संस्कार भारती’ कोकण प्रांताच्या पुढाकारातून सुरु झालेल्या ’THE ROOTS OPEN MIC ’ या उपक्रमाने आपल्या दोन यशस्वी वर्षांची पूर्तता साजरी केली. ‘सा कला या विमुक्तये’ या मूलमंत्रासोबत विविध कलांच्या अभिव्यक्तीसाठी कार्यरत असलेला हा अनोखा उपक्रम. या उपक्रमांतर्गत दर महिन्याच्या तिसर्‍या शनिवारी होणार्‍या कार्यक्रमाच्या यंदाच्या सत्रात मातृदिवस आणि समरसतेसारख्या भावनिक विषयांना वाहिलेली सादरीकरणे करण्यात आली. तसेच दि. 20 मे रोजी येणार्‍या थोर कवी सुमित्रानंदन पंत यांच्या जयंतीनिमित्त त्यांना आदरांजली वाहण्यात ..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121