आदित्य ठाकरे महाराष्ट्रात गोबेल्स नीतीचा वापर करून खोट्या गोष्टीं पसरवतायत असा आरोप आम्ही नाही तर शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी केलाय. पण कोण होता हा गोबेल्स? काय आहे त्याची थिअरी? दुसऱ्या महायुद्धात त्याने हिटलरसाठी नेमकी कोणती कामगिरी बजावली होती. आणि आदित्य ठाकरेंची गोबेल्स बरोबर दीपक केसरकर का तुलना करतायत.
सर्वप्रथम दीपक केसरकर काय बोलले ते जाणून घेऊयात -
हिटलर ने जेव्हा सबंध विश्वाला दुसऱ्या महायुद्धाच्या दरीत ढकललं होत. तेव्हा त्याच्यासोबत गोबेल्स होता. गोबेल्स हा हिटलरचा मंत्री होता. एखादी खोटी गोष्ट शंभर वेळा ओरडून सागितली कि ती जगाला खरी वाटू लागते. त्याच प्रमाणे आदित्य ठाकरे देखील महाराष्ट्रात तेच करतायत. ते लोकांमध्ये खोट्या गोष्टी पसरवतायत. केवळ बाळासाहेबांचे नातू असल्याने आम्ही आदित्य ठाकरेंबद्दल आदर बाळगून आहोत. पण गोबेल्सच्या मार्गावर चालून ते आमच्याबद्दल चुकीचे पसरवत असतली तर आम्ही ते टॉलरेट करून घेणार नाही. ही भूमी छत्रपती शिवाजी महाराजांची भूमी आहे त्यामुळे इथे गोबेल्सला मान्यता नाहीये.
आता जरा गोबेल्स याच्या बद्दल काही गोष्टी जाणून घेऊयात -
३१ ऑक्टोबर १८९७ मध्ये प्रशियात जन्मलेला गोबेल्स हा नाझी जर्मनीमधील एक महत्त्वाचा मंत्री होता. तो अडोल्फ हिटलरचा सर्वात विश्वासू सैनिक आणि अत्यंत जवळचा माणूस होता. म्हणूनच नाझी पक्षाची धोरणे व विचार सामान्य जर्मन नागरिकांपर्यंत पोचवण्याची जबाबदारी हिटलरने गोबेल्सच्या खांद्यावर सोपवली होती. गोबेल्स आपल्या कट्टर ज्यूविरोध व प्रभावी भाषणशैलीसाठी ओळखला जायचा.
तो अत्यंत बुद्धिमान होता. इ.स. १९२१ साली हायडेलबर्ग विद्यापीठातून आपले शिक्षण पूर्ण केल्यावर गोबेल्सने अनेक व्यवसाय आजमावले. शेवटी इ.स. १९२८ सालापर्यंत त्याने राजकारणात प्रवेशकरून तो बर्लिनमधील एक प्रभावशाली पुढारी बनला. पुढे इ.स. १९३३ साली नाझी पक्ष सत्तेवर आल्यानंतर ग्योबेल्सने जर्मनीमधील प्रसारमाध्यमांवर संपूर्ण नियंत्रण मिळवले. आणि गोबेल्स एक राजकीय थेअरी मांडली ती म्हणजे एखादी खोटी गोष्ट तुम्ही शंभर वेळा जगाला मोठ्याने ओरडून सांगितलीत कि ती खोट गोष्ट लोकांना खरी वाटू लागते.
आपल्या याचं तंत्राचा गोबेल्सने व हिटलरने पुरे पूर वापर केला आणि दुसऱ्या महायुद्धात जर्मनीची पीछेहाट होत असताना देखील आपण युद्ध जिंकणार आहोत. हिटलरकडे अशी काही गुप्त शास्त्र आहेत ज्याद्वारे आपण शत्रूला बेचीराग करू असे खोटे वृत्त जर्मन नागरिकांमध्ये ग्योबेल्सने पसरवले.
आता थोडं शिवसेनेसाठी ग्ल्योबेल्स तंत्रातल्या काही गोष्टी कशा घातक ठरल्या त्या जाणून घेऊयात-
शिवसेनेतील शिंदे गटाच्या उठावाच्या वेळी किंवा त्याआधी शिवसेनेत सगळ आलबेल नसताना देखील स्वपक्षीय आमदारांना उद्धव ठाकरे किंवा आदित्य ठाकरे कस्पटा समान लेखत होते. सध्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना तर वरून देसाई आणि आदित्य ठाकरे यांच्यामुळे तास तास भर ताटकळत केबिनबाहेर बसावे लागायचे, अशा चर्चा आहेत. शिंदे गटातील अनेक आमदारांना उद्धव ठाकरेंची भेट कशी दुरापास्त होती याची हकीकत आपल्या तोंडून अनेकदा सांगितलेली तुम्ही ऐकली असेल.
शिंदेगटाच्या उठावाच्या वेळी या बंडखोरांमुळे शिवसेनेचा कपचा देखील उडणार नाही अशा अर्थाची विधाने संजय राऊत वारंवार करत होते. गुलाबराव पाटील एकनाथ शिंदे यांचे म्हणणे ऐकून घ्या अशी उध्दव ठाकरे यांच्याकडे विनंती करायला गेले असताना संजय राऊत यांनी एकनाथ शिंदे यांच्या विरोधी वक्तव्य करून शिंदे आणि ठाकरे यांच्यात बोलणी फिसकटतील याची काळजी घेतली.
गोबेल्स नीतीचा एका ठराविक वेळा पर्यंत हिटलरला फायदा झाला ही गोष्ट जरी खरी असली तरी सत्य गोष्टींची माहिती न मिळाल्याने जर्मनीला द्वीतीय विश्वयुद्धात फटका बसला. उदाहरण द्यायचे झाल्यास थंडीच्या मोसमात सोव्हिएट रशियावर चालून जाणे म्हणजे स्वतःच्या पायावर धोंडा मारून घेण्यासारखं आहे, ही गोष्ट हिटलरला कोणी तरी समजावण गरजेची होती.
कदाचित ज्या प्रमाणे सुरातेला गेलेल्या शिंदेना काहीही करून पुन्हा माघारी बोलवा या गुलाबराव पाटलांच्या कळकळीच्या विनंतीमध्ये संजय राऊतांनी खोडा घातला तसेच एखादे राऊत हिटलरच्या आजूबाजूला असावेत ज्यांच्यामुळे काहीं आत्मघातकी निर्णय हिटलरने घेतले आणि स्वतःचा नाश ओढवला.
शिवसेना देखील अशाच आत्मघातकी निर्णयांमुळे दुबंघली. ज्यामुळे आदित्य ठाकरेंवर शिवसंवाद यात्रा किंवा निष्ठा यात्रे निमित्त राज्यभर दौरे करण्याची वेळ आलीये. अर्थात हिटलरचे आम्ही फक्त उदाहरण देतोय माजी मुख्यामंत्री उद्धव ठाकरे यांचे वागणे हिटलर सारखे आहे असे आम्हाला अजिबात सुचवायचे नाही. पण शिवसेनेत कार्यकारणी निवड वा अध्यक्ष निवड यावरून केसरकरांनी ठाकरे गटावर टीका केली आहे.
असो आता जरा आदित्य आणि गोबेल्स यांची तुलना योग्य कि अयोग्य ते पाहूया -
डॉ. पॉल ज्योसेफ ग्योबेल्स हा अत्यंत विद्वान मनुष्य होता. जर्मनीसह जगभरात नावलौकिक असलेल्या हायडेनबर्ग या विद्यापीठातून त्याने पीएचडीची पदवी संपादन करून डॉकरेट मिळवली होती. त्यामुळे शैक्षणिक दृष्ट्या आदित्य आणि ग्योबेल्स यांची तुलना होऊ शकत नाही. दुसरा मुद्दा गोबेल्सचे वडील आदित्य ठाकरेंच्या वडिलांप्रमाणे कोणत्याही राजकीय पक्षाचे प्रमुख नव्हते त्यामुळे त्याने आपले राजकीय करियर स्वकष्टाने कमावले.
गोबेल्सने ज्यू समाजाचा अनन्वित छळ केला त्याबाबतीत तो अत्यंत क्रूर होता. १९३५ सालचा जर्मनीतील हा न्युर्नबर्ग कायदा, ज्याद्वारे जर्मनीत ज्यू समाज चालवत असलेल्या व्यवसाय व उद्योग बंद पडण्याची योजना आखण्यात आली, त्यात ग्योबेल्सची मोठी भूमिका होती. त्याने सिनेगॉंग म्हणजेच ज्यू समाजाची प्रार्थनास्थळे जाळली.
त्यामुळे आदित्य अजून तरी क्रूर वाटावेत असे वागेलेल नाहीत. त्यामुळे क्रूरतेत देखील ग्योबेल्स आणि आदित्य यांची बरोबरी होऊ शकत नाही. ग्योबेल्सने ज्यू विरोधी अजेंडा राबवण्यासाठी चित्रपटांचा मोठ्या खुबीने वापर केला आता आदित्य पेज थ्री कल्चरचे असल्याने आणि सिने क्षेत्रात त्यांचे अनेक मित्र असल्याने भविष्यात शिंदे गटा विरोधी प्रचारतंत्रासाठी चालवण्यासाठी त्यांच्याकडून सिनेमाचा वापरू होऊ शकतो.पण ही सुद्धा फक्त शक्यता आहे.
शेवटचा आणि अत्यंत महत्वाचा मुद्दा तो म्हणजे ग्योबेल्सच्या निष्ठेचा आणि आंतरराष्ट्रीय ख्यातीचा -
ग्योबेल्स दोस्त राष्ट्रांसाठी कितीही घातक असला तरी त्याचे त्याच्या जर्मनीवर मनापासून प्रेम होते ही गोष्ट कोणीही नाकारू शकत नाही. त्याची हिटलरवर प्राणांतीक भक्ती होती. आपल्या आयुष्याचा शेवटचा काळ त्याने हिटलर सोबत त्याच्या अंडर ग्राउंड बंकर मध्ये घालवला. भारतीय स्वातंत्र्य लढ्याला मदत मिळावी यासाठी सुभाषचंद्र बोस यांनी जगभरातील इंग्रजांशी शत्रूंत्व असलेल्या अनेकांची भेट घेतली होती.
त्यामध्ये हिटलरचा देखील समावेश होता. जेव्हा सुभास बाबू आणि हिटलरची भेट झाली तेव्हा गोबेल्स देखील तिथे उपस्थित होता. आपल्या मृत्यूपत्रात आपल्यानंतर गोबेल्सला आपला उत्तराधिकारी म्हणून हिटलरने नेमले होते. त्याप्रमाणे ३० एप्रिलला हिटलरने आत्महत्या केल्यावर ग्योबेल्स जर्मनीचा चान्सलर झाला होता. पण आपल्या नेत्याच्या अत्म्हत्येने खचून गेलेल्या गोबेल्सने दुसऱ्याच दिवसी म्हणजे १ मे १९४५ या दिवशी आपली ६ अपत्य आणि पत्नी सोबत सायनाईट खाऊन आत्महत्या केली. त्यामुळे अशा काही मुद्द्यामुळे आदित्य ठाकरे आणि गोबेल्स यांची तुलना अशक्य आहे.