नवी दिल्ली: राष्ट्रीय महिला आयोगाने काँग्रेस खासदार अधीर रंजन चौधरी यांना एक नोटीस बजावून त्यांना पॅनेलसमोर वैयक्तिकरित्या हजर राहण्यास आणि त्यांच्या 'राष्ट्रपत्नी' टिप्पणीबद्दल लेखी स्पष्टीकरण देण्यास सांगितले आहे. आयोगाने दि. ३ ऑगस्ट रोजी सकाळी ११:३० वाजता हजर राहण्यास सांगितले आहे.
एनसीडब्ल्यूने काँग्रेस प्रमुख सोनिया गांधी यांना पत्र लिहून या प्रकरणात हस्तक्षेप करण्यास आणि अधीर रंजन चौधरी यांच्या "अपमानजनक" टिप्पणीबद्दल योग्य कारवाई करण्यास सांगितले आहे. राष्ट्रीय महिला आयोगा सोबतच, १३ राज्य महिला आयोगांनी देखील खासदार अधीर रंजन चौधरी यांनी केलेल्या टिप्पण्यांचा निषेध करणारे संयुक्त निवेदन जारी केले आहे. त्यांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या विरोधात काँग्रेस खासदाराच्या टिप्पणीला “अपमानास्पद, लैंगिकतावादी आणि राष्ट्रपतींचा अपमान करण्याचा प्रयत्न” असे म्हटले आहे. मात्र, “मी हे फक्त एकदाच उच्चारले. जीभ घसरली होती. हा सगळा मुद्दा भाजपकडून उधळून लावला जात आहे आणि विनाकारण वाद निर्माण केला जात आहे." यावर प्रतिक्रिया देताना अधीर रंजन चौधरी म्हणाले.