सावरकरांच्या विचारांचा प्रसार करणे आवश्यक: अभिनेते शरद पोंक्षे

    24-Jul-2022
Total Views | 83

Savarkar
 
 
 
 
 

पुणे: सावरकरांचे मोठेपण मान्य करणे काही लोकांसाठी राजकीय तोटा आहे. हे लोक सावरकरांना विरोध करतात. सावरकरांवरील आक्षेपांना उत्तर देण्याऐवजी त्याकडे दुर्लक्ष केले पाहिजे. सावरकर विचारांचा अभ्यास केला पाहिजे. त्यांच्या विचारांचा प्रसार करणे आवश्यक आहे. त्यासाठी शासनाच्या माध्यमातून प्रयत्न व्हावेत, असे मत ज्येष्ठ अभिनेते शरद पोंक्षे यांनी व्यक्त केले.
 
 
डीईएसच्या मा. स. गोळवलकर गुरुजी विद्यालयाच्या वतीने मृत्युंजयी स्वातंत्र्यवीर सावरकर या सावरकरांच्या साहित्यावरील नृत्य, नाट्य, संगीत आणि अभिवाचनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात पोंक्षे बोलत होते. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षा निमित्त या कार्यक्रमाचे आयोजन केले होते.
 
 
डीईएसचे अध्यक्ष डॉ. शरद कुंटे अध्यक्षस्थानी होते. अभिनेते योगेश सोमण, शाला समितीचे अध्यक्ष मिलिंद कांबळे, जेआरव्हीजीटीआयचे संचालक प्रशांत गोखले, मुख्याध्यापिका लीना तलाठी, मंजूषा खेडकर यांची प्रमुख उपस्थिती होती. सावरकरांच्या विचारात राष्ट्राचा ध्यास आणि ध्येय होते. त्यांचे विचार पुढे नेण्यासाठी आता प्रत्येकाने सावरकर होण्याची आवश्यकता आहे, असे सोमण म्हणाले, तर सुजाण आणि संस्कारक्षम पीढी घडविण्यासाठी डीईएसच्या वतीने सातत्याने देशभक्तीपर कार्यक्रमांचे आयोजन केले जाते, असे कुंटे म्हणाले.
 
 

Savarkar१  
 
 
 
 
जय देव जय देव जय शिवराया, जयोस्तुते, ने मजसी ने परत मातृभूमीला अशा प्रसिद्ध आणि अप्रचलित गाण्यांनी देशभक्तीच्या वातावरणाची निर्मिती झाली. हे हिंदू नृसिंहा प्रभो शिवाजी राजा, वंदे मातरम् या गीतांवर नृत्यांचे सादरीकरण करण्यात आले. संगीत सन्यस्त खड्ग या नाटकाच्या नाट्य प्रयोगाला प्रेक्षकांनी भरभरून प्रतिसाद दिला. शाळेतील १७५ विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला.
 
 
 
 
 
 
अग्रलेख
जरुर वाचा
सामाजिक न्यायासाठी परखड आवाज : आमदार अमित गोरखे

सामाजिक न्यायासाठी परखड आवाज : आमदार अमित गोरखे

सामाजिक न्याय या मूल्याला कृतीत उतरवण्यासाठी आणि अनुसूचित जाती-जमातींच्या प्रश्नांना विधायक वळण देण्यासाठी ज्यांनी जनमानसाशी थेट संवाद ठेवला, अशा आ. अमित गोरखे यांना २०२५ सालच्या पावसाळी अधिवेशनात विधान परिषदेचे तालिका सभापती म्हणून पहिल्यांदाच कामकाज पाहण्याची संधी मिळाली. या विशेष अनुभवाबरोबरच त्यांनी ‘सरकारची भूमिका’, ‘उपवर्गीकरणाचा मुद्दा’, ‘अस्पृश्यतेचे प्रश्न’, ‘धर्मांतरविरोधी धोरण’ आणि ‘महाराष्ट्र जनसुरक्षा कायदा’ यांसारख्या संवेदनशील विषयांवर अत्यंत स्पष्ट आणि ठाम भूमिका मांडली. दै. ‘मुंबई तरुण ..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121