ठाणे : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटासोबत जाणाऱ्यांची हकालपट्टी करण्याचा सपाटा शिवसेना नेतृत्वाकडून सुरू आहे. यावरुन नुकतेच शिवसेना सोडुन शिंदे गटात सामिल झालेल्या रामदास कदम यांनी, हकालपट्टीसाठी वेगळी समितीच नेमावी.असा टोला लगावत एकप्रकारे शिवसेना नेतृत्वाची खिल्ली उडवली.तसेच, बाळासाहेबांच्या पाठीत कुणी खंजीर खुपसला. हे लवकरच उघड करणार. असा गर्भित इशाराही कदम यांनी दिला.रामदास कदम हे शुक्रवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाण्यातील निवासस्थानी भेटीसाठी आले होते तेव्हा त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.यावेळी त्यांच्यासोबत त्यांचे सुपुत्र आ. योगेश कदम देखील होते.
शिवसेनेत अभूतपूर्व उठाव करून मुख्यमंत्रीपदी विराजमान झालेल्या एकनाथ शिंदे यांना राज्यभरातील शिवसेना नेते आणि पदाधिकाऱ्यांकडुन समर्थन मिळत आहे. तर शिवसेना नेतृत्व मात्र, शिवसेना वाचवण्याऐवजी शिंदे यांच्या गटात जाणाऱ्यांची हकालपट्टी करण्यात व्यस्त आहे. या पार्श्वभूमीवर गेले अनेक दिवस नाराज असलेल्या शिवसेनेचे नेते रामदास कदम यांनी पक्ष नेतृत्वावर घणाघाती टीका करीत नेते पदाचा राजीनामा दिला होता.मात्र ज्या ज्या पदाधिकाऱ्यांची हकालपट्टी शिवसेना करत आहे.
त्या त्या पदाधिकाऱ्यांना पुन्हा पदावर नियुक्त करण्याचे काम मुख्यमंत्री एकनाथ शिंदे करत आहेत. शिवसेना नेतृत्वाला धक्यांवर धक्के मिळत असताना राजीनामा दिलेल्या रामदास कदम यांची पुन्हा एकनाथ शिंदे यांच्याकडून नेते पदी नियुक्ती करण्यात आली. त्यानंतर शुक्रवारी रामदास कदम हे एकनाथ शिंदे यांच्या ठाण्यातील निवासस्थानी भेटीसाठी दाखल झाले. यावेळी कदम यांनी ,एकनाथ शिंदे यांच्याकडे अनेक कार्यकर्ते आणि पदाधिकारी यांचा ओघ सुरू असून पक्षातून हकालपट्टी करण्यासाठी आता शिवसेना नेतृत्वाने वेगळी समितीच नेमावी.अशी बोचरी टीका पक्ष नेतृत्वावर करुन एकप्रकारे खिल्ली उडवली.
बाळासाहेबांच्या पाठीत खंजीर खुपसणाऱ्याचा लवकरच खुलासा - कदम
आदित्य ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्यावर काहीही बोलणार नसल्याचे सांगणाऱ्या रामदास कदम यांनी बाळासाहेबांच्या पाठीत कुणी खंजीर खुपसला याचा लवकरच खुलासा करणार असल्याचा गर्भीत इशारा दिला आहे.आदित्य ठाकरे यांचे जेवढं वय नाही तेवढं आमचं राजकारणातील कार्य आहे. त्यामुळे आदित्यकडून राजकारण शिकण्याची आम्हाला गरज नसल्याचेही कदम म्हणाले.
पब कल्चर वाल्यानी शिवसेना वाढवली नाही
युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी शिवसंवाद यात्रेदरम्यान केलेल्या आरोपाना प्रतिउत्तर देत ठाणे जिल्हाप्रमुख नरेश म्हस्के यांनी चांगलाच समाचार घेतला. आदित्यचे जेवढं त्यांचं वय आहे तेवढी वर्ष आम्ही शिवसेनेसाठी मेहनत केली आहे,युवासेनेचे वरूण देसाई किंवा सुरज चव्हाण अशा पब कल्चर युवा सैनिकांनी शिवसेना वाढवलेली नाही. आम्ही संयम राखला आहे आमच्या संयमाचा बांध फुटु देऊ नका.असा इशाराही म्हस्के यांनी दिला.
ळी समितीच नेमा : कदमांचा ठाकरेंना टोला