लता दीदींच्या स्वप्नातील 'वृद्धाश्रम'

वृद्ध कलाकारांसाठी वृद्धाश्रमाची स्थापना

    20-Jul-2022
Total Views | 50
 
latadidi
 
 
 
 
मुंबई : फक्त भारतातच नाही तर संपूर्ण जगात, जिथेजिथे गाणे आहे तिथे तिथे स्वरसम्राज्ञी लता मंगेशकर यांचे नाव आहे. आपल्या प्रत्येक गाण्यातून त्यांनी श्रोत्यांच्या मनावर राज्य केले आहे. आज त्या नसल्या तरीही त्यांचा आवाज आजही कायम आहे. संगीत क्षेत्रात तर त्यांच्या जाण्याने कधीही भरून न निघणारी पोकळी तयार झाली आहे. त्यांनी फक्त संगीत क्षेत्रातच नाही तर सामाजिक क्षेत्रातही तेवढेच मोलाचे योगदान दिले. दीदींच्या पश्च्यात आता त्यांच्या नावाने वृद्धाश्रमाची निर्मिती केली जाणार आहे.
 
 
 
अबालवृद्ध दीदींचे चाहते आहेत. मंगेशकर प्रतिष्ठानचे अनेक उपक्रम आहेत, आता दीदींच्या नावे काही सुरु करता येऊ शकते का अशी चर्चा सुरु होती. त्यामुळे या चर्चेला आता पूर्णविराम मिळणार आहे कारण, आता लवकरच त्यांच्या नावाने वृद्धाश्रमाची स्थापना करण्यात येणार आहे. लता दीदींनी सामाजिक संस्थाना नेहमची सढळ हाताने मदत केली आहे, त्यामुळे काही दिवसांपूर्वी दीदींच्या नावाने संगीत विद्यालय सुरु करण्याविषयी देखील चर्चा सुरु होती. ते काम देखील पूर्णत्वाच्या मार्गावर असल्याचे सांगण्यात आले आहे.
 
 
 
लता मंगेशकर यांच्या इंस्टाग्राम अकाउंटवरुन एक पोस्ट शेयर करण्यात आली आहे. त्यामध्ये लता मंगेशकर यांचे एक स्वप्न पूर्ण होणार असल्याचे सांगण्यात आले आहे. त्या पोस्टमध्ये सांगण्यात आले आहे की, 'देशाच्या गानकोकिळा स्वरसम्राज्ञी लता मंगेशकर यांनी एक स्वप्न उराशी बाळगले होते. आता ते पूर्ण होणार आहे.'
 
 
 
वृद्धाश्रमाची निर्मिती करणे हे दीदींचे स्वप्न होते. ते अशा लोकांसाठी की जे संगीत, आर्ट, चित्रपट आणि थिएटरशी संबंधित आहे. त्यांच्याकरिता वृद्धाश्रमाची निर्मिती केली जाणार आहे. त्या फाउंडेशनचे म्हणणे आहे की, ज्या कलाकारांनी कला क्षेत्रासाठी महत्वपूर्ण योगदान दिले आहे, त्यांनी अथक संघर्ष केला आहे. मात्र ते एकटे आहेत. कुटूंबापासून दुरावले गेले आहेत. त्यांच्यासाठी या प्रोजेक्टची निर्मिती करण्यात आली आहे.
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121