मुंबई : "उद्धव ठाकरेंना जुळा भाऊ आहे का ? दिल्लीत सोनिया गांधींना भेटायला आलेल्या उद्धव ठाकरेंची हायकमांड १० जनपथ आहे का?" असा सवाल विचारात भाजप आमदार नितेश राणे यांनी खा. संजय राऊत यांचा जबरदस्त समाचार घेतला. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दिल्लीत पंतप्रधानांची भेट घेण्यासाठी गेले आहेत, त्यांची हायकमांड तिकडे असल्याने ते तिकडे गेले आहेत अशी टीका संजय राऊत यांनी आपल्या सोमवारी झालेल्या पत्रकार परिषदेत केली होती.
२०२० मध्ये उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे हे काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांची भेट घेण्यासाठी आले असतानाचा फोटो ट्विट करत राणेंनी संजय राऊतांना गजनी चित्रपटातील आमीर खान सारखा आजार झालाय का ? असा खोचक सवालही राणेंनी केला आहे. "राऊतांच्या म्हणण्यानुसार शिवसेनेचे मुख्यमंत्री कधीच हायकमांडला भेटायला दिल्लीत आले नव्हते मग या फोटोत दिसतोय तो उद्धव ठाकरेंचा जुळा भाऊ आहे का ? असा सवाल राणे यांनी आपल्या ट्विट मध्ये केला आहे.