मुंबई महापालिकेच्या सोडतीचा कार्यक्रम जाहीर

    24-May-2022
Total Views | 43

mumbai munciple
 
 
 
 
 
 
मुंबई : राज्य निवडणूक आयोगाच्या वतीने राज्यातील महापालिका निवडणुकांसदर्भात महत्वाचे परिपत्रक प्रसिद्ध करण्यात आले आहे. राज्य निवडणूक आयोगाने राज्यातील १३ महापालिकांपाठोपाठ मुंबई महापालिकेच्या आरक्षण सोडतीचा कार्यक्रम जाहीर केला आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या ओबीसी राजकीय आरक्षणासंदर्भातील निर्णयानंतर राज्य निवडणूक आयोगाकडून निवडणुकीची तयारी सुरु करण्यात आली आहे.
 
 
 
त्यानुसार राज्यातील मुंबई महापालिकेच्या निवडणुकाची अंतिम प्रभागरचना देखील प्रसिद्ध करण्यात आली आहे. याशिवाय नवी मुंबई, वसई विरार, उल्हासनगर, कोल्हापूर, अकोला, अमरावती, नागपूर, सोलापूर, नाशिक, पुणे, पिंपरी चिंचवड, कल्याण डोंबिवली आणि ठाणे महापालिकेच्या आरक्षण सोडतीचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला असून मुंबई महापालिकेची आरक्षण सोडत १३ जून रोजी राजपत्रात प्रसिद्ध करण्यात येईल, असे राज्य निवडणूक आयोगाकडून प्रसिद्ध करण्यात आलेल्या परिपत्रकात म्हटलं आहे.
 
 
 
आरक्षण सोडत कार्यक्रम कसा असेल ?
 
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी आरक्षण सोडतीसंदर्भातील पहिली नोटीस २७ मे रोजी प्रसिद्ध करण्यात येईल. ३१ मे रोजी अनुसूचित जाती (महिला) आणि अनुसूचित जमाती (महिला) आणि सर्वसाधारण महिला आरक्षण सोडत काढली जाईल. ही आरक्षण सोडत १ जून रोजी वृत्तपत्रात प्रसिद्ध करुन हरकती मागवल्या जातील. आरक्षण सोडतीवरील हरकती आणि सूचना १ ते ६ जून दरम्यान स्वीकारल्या जातील. अंतिम आरक्षण सोडत १३ जून रोजी राजपत्रात प्रसिद्ध केली जाईल.
 
 
 
 
 
 
 
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121