राणा दांपत्यांविरोधात पोलिसांची कारवाई; फडणविसांचा मुख्यमंत्र्यांवर हल्लाबोल!

    23-Apr-2022
Total Views | 165

Devendra Fadnavis Uddhav Thackeray
 
 
 
मुंबई : भाजप खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांनी मातोश्री यावर येऊन मुख्यमंत्र्यांसोबत हनुमान चालीसा पठणाची इच्छा काही दिवसांपूर्वी व्यक्त केली. मात्र शनिवारी (दि. २३ एप्रिल) राणा दांपत्यांना घराबाहेर पोलीसांकडून त्यांना अडवण्यात आले. त्यांच्यावर काही कलमांअंतर्गत कारवाई करण्यात आली. यावेळी शिवसैनिकही आक्रमक भूमिकेत दिसून आले. यावर विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी ट्वीट करत ठाकरे सरकारकडून पोलिसांमर्फत करण्यात आलेल्या कारवाईला तीव्र विरोध दर्शवत मुख्यमंत्र्यांवर हल्लाबोल केला आहे.
 
 
 
"भाजपाच्या पोलखोल रथावर हल्ले मात्र आरोपीला अद्याप अटक झाली नाही, मोहित भारतीय यांच्यावर हल्ला झाला, एका महिला लोकप्रतिनिधीला २० फूट गाडण्याची भाषा काहींनी केली त्याची साधा गुन्हा दाखलसुद्धा घेतली नाही. परंतु राणा दाम्पत्य हनुमान चालिसा पठनाला येणार म्हटल्यावर त्यांना थेट अटक करण्यात आली. इतकी दंडुकेशाही? इतका अहंकार? इतका द्वेष? सत्तेचा इतका माज? एवढीच तुमची मदुर्मकी? लोकशाहीत मत मांडण्याचा अधिकार संपला?", असे ट्वीट करत फडणविसांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे. "सत्तेच्या मस्तीत कसेही वागून घ्या. पण, जनता सारे काही पाहते आहे! ही गोष्ट निव्वळ लज्जास्पद आहे. लोकशाहीचे गार्‍हाणे गाणारे आज सोयीस्कर गप्प का?" असेही ते पुढे म्हणाले.
 
 
 
 
 
अग्रलेख
जरुर वाचा
गोरेगाव-मुलुंड जोड रस्त्याच्या भुयारी कामाला वेग राष्ट्रीय उद्यानातील वन खात्‍याची १९.४३ हेक्‍टर जागा बीएमसीकडे वळती - केंद्रीय पर्यावरण, वन व वातावरणीय बदल मंत्रालय यांची अंतिम मान्‍यता

गोरेगाव-मुलुंड जोड रस्त्याच्या भुयारी कामाला वेग राष्ट्रीय उद्यानातील वन खात्‍याची १९.४३ हेक्‍टर जागा बीएमसीकडे वळती - केंद्रीय पर्यावरण, वन व वातावरणीय बदल मंत्रालय यांची अंतिम मान्‍यता

मुंबईतील पूर्व आणि पश्चिम उपनगरांना जोडणाऱ्या महत्वाकांक्षी गोरेगाव - मुलुंड जोड रस्ता प्रकल्प (तिसरा टप्पा) अंतर्गत बोरिवली येथील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाखालून जाणाऱ्या जुळ्या बोगद्याच्या बांधणीला आता गती मिळणार आहे. प्रत्येकी ४.७ किलोमीटर अंतराच्या आणि ४५.७० मीटर रुंदीच्‍या जुळ्या बोगद्यासाठी आवश्‍यक असलेली १९.४३ हेक्‍टर वनजमीन बृहन्‍मुंबई महानगरपालिकेकडे वळती करण्‍यास केंद्रीय पर्यावरण, वन व वातावरणीय बदल मंत्रालय यांची अंतिम मान्‍यता मिळाली आहे. त्‍यानुसार, अटी व शर्तींचे अनुपालन तसेच पूर्ततेची ..

राज्यातील १८ हजार शाळांमध्ये पटसंख्या २० पेक्षा कमी

राज्यातील १८ हजार शाळांमध्ये पटसंख्या २० पेक्षा कमी

१ हजार ६५० गावांमध्ये प्राथमिक, तर ६ हजार ५५३ गावांमध्ये उच्च प्राथमिक शाळा नाहीत राज्यातील एक लाखांहून अधिक शाळांपैकी सुमारे १८ हजार शाळांमध्ये विद्यार्थ्यांची संख्या २० पेक्षा कमी आहे. तर १ हजार ६५० गावांत प्राथमिक आणि ६ हजार ५५३ गावांत उच्च प्राथमिक शाळा उपलब्ध नाहीत. विद्यार्थी संख्येत घट झाली असली, तरी त्या शाळा सुरूच राहतील आणि त्या ठिकाणी शिक्षणात अडथळा येणार नाही, याची संपूर्ण काळजी घेतली जाईल. ज्या ठिकाणी विद्यार्थ्यांची संख्या वाढत आहे, तेथे अतिरिक्त शिक्षकांचे समायोजन करण्यात येत असल्याची माहिती ..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121