महात्मा फुले यांच्या १९५व्या जयंतीनिमित्त आज 'फुले' चित्रपटाचा फर्स्ट लुक रिलीज करण्यात आला आहे. प्रतिक गांधी महात्मा ज्योतिबा फुले यांची व्यक्तिरेखा साकारताना दिसत आहे . आणि पत्रलेखा सावित्रीबाई फुले यांची भूमिका साकारत आहे. प्रतिक आणि पत्रलेखा या दोघांमध्येही महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्याशी विलक्षण साम्य असल्याने या जोडीने खूप उत्सुकता निर्माण केली आहे. हा चित्रपट २०२३ साली चित्रपटगृहात प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे.