ईशान्य भारताच्या वादमुक्तीचा ‘अमित शाह पॅटर्न’

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    29-Mar-2022   
Total Views |
shah


तीन वर्षांत ५ वादांचे निराकरण, सशस्त्र गटांचे आत्मसमर्पण
 
 
 
नवी दिल्ली, पार्थ कपोले : आसाम आणि मेघालय दरम्यान सुमारे ५० वर्षांपासून सुरू असलेला सीमावाद जवळपास मिटला आहे. मंगळवार, २९ मार्च रोजी देशाची राजधानी नवी दिल्ली येथे आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा आणि मेघालयाचे मुख्यमंत्री कॉनरॅड संगमा यांच्या उपस्थितीत केद्रीय गृह व सहकार मंत्री अमित शहा यांच्या उपस्थितीत सीमावाद संपवण्याच्या दिशेने पहिला करार झाला आहे.
 
 
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी गृहखात्याची सूत्रे हाती घेतल्यापासून ईशान्य भारतातील राज्यांचे सीमावाद आणि सशस्त्र गटांचे आत्मसमर्पण घडविण्यावर विशेष भर दिला आहे. गेल्या तीन वर्षांत (२०१९ ते २०२२) ६ हजार ९०० सशस्त्र बंडखोरांनी आत्मसमर्पण केले आहे आणि ४ हजार ८०० शस्त्रे सरकारजमा करण्यात आली आहेत. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी ईशान्य भारतातील राज्यांच्या मुख्यमंत्र्यामध्ये समन्वय निर्माण करण्यातही महत्वाची भूमिका बजावली असून त्यामुळे वादमुक्त ईशान्य भारताचे स्वप्न साकारताना दिसत आहे.
 
 
आसाम – मेघालय वादाचे खरे कारण काय ?
 
 
आसाम आणि मेघालयदरम्यान ८८५ किलोमीटर लांबीची सीमा आहे. सध्या त्यांच्यात सीमारेषेवरील १२ मुद्यांवरून वाद सुरू होता. आसाम-मेघालय सीमा विवाद अप्पर ताराबारी, गझांग राखीव वन, हाहीम, लांगपीह, बोरडुर, बोकलापारा, नोंगवाह, मातमूर, खानापारा-पिलांगकाटा, देशदेमोराह ब्लॉक १ आणि ब्लॉक २, खंडुली आणि रातचेरा या क्षेत्रांचा समावेश आहे. आसाम पुनर्रचना कायदा १९७१ अंतर्गत मेघालय हे आसाममधून वेगळे करण्यात आले होते, या कायद्याला मेघालयाने आव्हान दिले आणि त्यामुळे संपूर्ण वाद निर्माण झाला.
 
 
आसाम आणि मेघालय यांच्यातील वादाचा प्रमुख मुद्दा म्हणजे आसामच्या कामरूप जिल्ह्याच्या सीमेवर असलेल्या पश्चिम गारो हिल्समधील लांगपीह जिल्हा. ब्रिटिश वसाहत काळात लांगपीह हा कामरूप जिल्ह्याचा भाग होता. पण स्वातंत्र्यानंतर तो गारो हिल्स आणि मेघालयचा भाग बनला.आसाम हा आसाममधील मिकीर हिल्सचा भाग मानतो. मेघालयने मिकीर हिल्सच्या ब्लॉक १ आणि २ वर दावा केला. कार्बी हा आंगलाँग हे आसामचा भाग आहेत. मात्र, मेघालयने त्यावर हक्क सांगून ते पूर्वीच्या संयुक्त खासी आणि जैंतिया हिल्स जिल्ह्यांचा भाग होते, असा दावा केला. मेघालयच्या निर्मितीनंतर लगेचच वाद सुरू झाला. आसामचे माजी मुख्यमंत्री तरुण गोगोई यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या १२ वर्षांच्या कार्यकाळात सीमावाद नेहमीच चर्चेत राहिला होता.
 
 
सीमावादावरून दीर्घकाळ हिंसाचार
 
 
सीमावादावरून दोन्ही राज्यांमध्ये हिंसक चकमकी झाल्या आहेत. आसाममधील कामरूपच्या सीमेवर १४ मे २०१० पश्चिम खासी हिल्समधील लांगपीह येथे आसाम पोलिस कर्मचार्यांीनी केलेल्या गोळीबारात खासी समाजातील चार गावकरी ठार तर १२ जण जखमी झाले होते. त्यानंतर २६ जुलै २०२१ रोजी आतापर्यंतचा सर्वात भीषण हिंसाचार झाला. ज्यामध्ये सहा आसाम पोलिस कर्मचारी ठार झाले आणि दोन्ही राज्यांतील सुमारे १०० नागरिक आणि सुरक्षा कर्मचारी जखमी झाले होते.
 
 
आता करारात नेमके काय ?
 
 
वादाच्या १२ पैकी ६ मुद्द्यांचे निराकरण करण्यात आले आहे, ज्यामुळे आता ७० टक्के सीमा वादमुक्त झाली आहे. उर्वरित ६ मुद्दे लवकरात लवकर सोडवण्याविषयी दोन्ही मुख्यमंत्र्यांचे एकमत आहे. कारारातील शिफारशींनुसार ३६.७९ चौरस किमी जमिनीपैकी आसाम आपल्यासाठी १८.५१ चौरस किमी जमिन ठेवणार असून उर्वरित १८.२८ चौरस किमी मेघालयला देण्यात येणार आहे.
 
 
 
@@AUTHORINFO_V1@@