हा तर ट्रेलर आहे पिक्चर २ एप्रिलला दाखविन : राज ठाकरे

    10-Mar-2022
Total Views | 74
            
raj thakre
 
 
पुणे: मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे मनसे वर्धापनदिनानिमित्त पुण्यात भाषण झाले. 'माझे आजचे भाषण हा फक्त ट्रेलर आहे २ एप्रिल रोजी होणाऱ्या गुढीपाडवा मेळाव्यात संपूर्ण पिक्चर दाखवेन" अशा पद्धतीने राज ठाकरे यांनी सर्व पक्षांना इशारा दिला. पक्षावर आतापर्यंत अनेक संकटे आली आणि गेली पण या सर्व संकटात तुम्ही माझ्यासोबत राहिलात याबद्दल तुम्हा सर्वांचे धन्यवाद अशा शब्दांत राज यांनी मनसे कार्यकर्त्यांचे आभार मानले.
 
 
बाबासाहेब पुरंदरे यांना सॉफ्ट टार्गेट बनवलं गेलं. आम्हाला इतिहास नाही बघायचा, आम्हाला इतिहास लिहिणाऱ्याची जात बघायची आहे! महाराष्ट्रात सर्वाना फक्त जातच बघायची आहे. कुठलाही ऐतिहासिक आधार नसताना रामदास स्वामी आणि शिवाजी महाराज यांच्या बद्दल वक्तव्य केली जात आहेत. आपल्या सर्वच महापुरुषांना जाती- जातींमध्ये वाटून लोकांची माथी भडकवायची हाच खेळ सध्या महाराष्ट्रात चालू आहे. ओबीसी आरक्षणाचा सुद्धा खेळ चालला आहे. फक्त जाती- पतींच्या राजकरणात लोकांना गुंतवून ठेवून मूळ प्रश्नांकडून लोकांचे लक्ष भरकटवायचे अशा शब्दांत राज यांनी महाराष्ट्रातील सध्याच्या राजकारणावर टीका केली.
 
 
शिवजयंती ही तिथीनुसारच साजरी व्हायला हवी त्यामुळे यंदा शिवजयंती २१ मार्चलाच साजरी करा असे कार्यकर्त्यांना त्यांनी आवाहन केले. १६ वर्षे अनेक संकटांमधून आपण गेलो पण तुम्ही माझ्या बरोबर राहिलात आणि मला साथ दिलीत हीच तुमची साथ आणि महाराष्ट्रासाठी चांगले काम करण्याची तुमच्या मनातील आग कायमच राहू द्या असे आवाहन राज यांनी आपल्या भाषणाच्या शेवटी केले.
 
 
 
 
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121