नवी दिल्ली : गेली अनेक वर्ष गांधी घराण्याचा पारंपारिक मतदारसंघ म्हणून प्रसिद्ध असलेल्या अमेठी आणि रायबरेलीत कॉंग्रेस तिसऱ्या स्थानी आहे. त्यामुळे स्वतःच्या घरातच प्रियांका गांधी आणि राहुल गांधींच्या नेतृत्त्वाला नापसंती मिळाल्याचे चित्र आता स्पष्ट झाले आहे. त्यामुळे कॉंग्रेसला हा सर्वात मोठा धक्का आहे.
काँग्रेसमधून नुकत्याच भाजपमध्ये आलेल्या आदिती सिंह रायबरेलीतून जवळपास २० हजाराहून अधिक मते मिळाली आहेत. तर समाजवादी पक्षाच्या राम प्रताप यादव हे ६ हजार मतांनी पिछाडीवर आहेत. तर कॉंग्रेसच्या डॉ. मनीष चोहान यांना जेमतेम २ हजारच मते पडली आहेत.
तर अमेठीत समाजवादी पक्षाचे महाराजी प्रजापती ८ हजार मतांसहित आघाडीवर आहे. तर दुसऱ्या स्थानी असलेल्या भाजपच्या डॉ. संजय सिंह यांना ६ हजारच्या जवळपास मते मिळाली आहेत. तर तिसऱ्या स्थानी असलेल्या कॉंग्रेसच्या आशिष शुक्ला यांना जेमतेम १ हजार मते पडली आहेत.