मुंबई: २०१९मध्ये भरती प्रक्रिया पूर्ण झाली असूनही अद्याप नियुक्ती न दिल्याने संतापलेल्या प्रशिक्षणार्थींकडून आज आंदोलन केले जात आहे. परिवहन मंत्री अनिल परब यांच्या वांद्रे येथील घराबाहेर हे आंदोलन करण्यात येते आहे. एसटी महामंडळाकडून २०१९मध्ये भरती प्रक्रिया पूर्ण झाली होती पण तरीही अद्याप नियुक्ती न मिळाल्याने १८०० प्रशिक्षणार्थी आज अनिल परब यांच्या घराबाहेर पोचले आहेत. याच आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर अनिल परब यांच्या घराबाहेर पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे.
एसटी महामंडळाकडून २०१९ मध्ये भरती प्रक्रिया पूर्ण करण्यात आली होती. या भरती होणाऱ्यांमध्ये चालक, वाहक, टेक्निशियन्स, सहाय्यक यांचा समावेश आहे. गेले दोन वर्षे रखडलेली नियुक्ती प्रक्रिया त्वरित पूर्ण केली जावी अशी या प्रशिक्षणार्थ्यांची मागणी आहे. त्याचसाठी आज आंदोलन होते आहे. १०० दिवसांतून जास्त काळ चाललेल्या एसटी संपावर अद्याप तोडगा निघाला नाहीये. त्यातच आता या आंदोलनाची भर पडून परिस्थती चिघळण्याची शक्यता आहे.