
मुंबई : छत्रपती शिवाजी महाराज हे अखंड महाराष्ट्राच्या गुरूस्थानी असलेले व्सक्तिमत्त्व आहेत. मात्र, शिवाजी महाराजांचे गुरु कोण? या प्रश्नावरून अनेकदा वाद होत असतात. असचं एक वक्तव्य राष्ट्रवादी पक्षाचे अध्यक्ष शरद पवारांनी केले होतं. यावेळी त्यांनी फक्त राजमाता जिजाऊचं महाराजांच्या गुरू होत्या असं विधान केले आहे. राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळेंनी आता पवारांच्या या वक्त्व्याचा व्हिडीओ त्यांच्या ट्विटरवर पोस्ट करत पवारांच्या वक्त्व्याचे समर्थन केले आहे.
“जे लोक सांगतात की रामदास शिवाजी महाराजांचे गुरु होते, ते खोटं...रामदास शिवाजी महाराजांचे गुरु नव्हते .शिवाजी महाराजांचे गुरु राजमाता जिजामाताचं होत्या." असं वक्तव्य शरद पवार यांनी एका कार्यक्रमात केले होते. या वक्तव्याचा व्हिडीेओ आपल्या ट्विटरवर शेअर करत सुप्रिया सुळेंनी पवारांच्या वक्त्व्याचे समर्थन केले आहे.
अनेकदा राजमाता जिजाऊ, दादोजी कोंडदेव यांच्यासह समर्थ रामदास स्वामी हे देखील छत्रपती शिवाजी महाराजांचे गुरू होते असे इतिहासकारांकडून सांगितले जाते. मात्र आता शरद पवारांनी थेट असे सांगणारे खोटं सांगतात असं म्हणत वादग्रस्त विधान केल्यामुळे छत्रपती शिवाजी महाराजांच्या एतिहासावरून पुन्हा वाद निर्माण होण्याची चिन्हे दिसत आहेत.