शिवजयंती साजरी केली म्हणून भाजप आमदारावर गुन्हा?

    21-Feb-2022
Total Views | 285

Shweta Mahale.

 
अमरावती : शनिवार, दि. १९ फेब्रुवारी रोजी शिवजयंतीनिमित्त बुलढाणातल्या चिखली शहरात भाजप आमदार श्वेता महाले यांच्या समवेत महिलांची मोटारसायकल रॅली काढण्यात आली होती. परंतु रॅलीच्या माध्यमातून कोरोना नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी श्वेता महालेंसह सुमारे पस्तीस जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
 
  
आमदार श्वेताताई महाले यांच्यासह अनेक महिला लोकप्रतिनिधी, विविध पक्षांच्या व सामाजिक संघटनांच्या महिला पदाधिकारी या रॅलीत मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या. मात्र कोरोना नियमांचे कारण सांगत रॅलीला परवानगी नसल्याचे चिखली पोलिसांचे म्हणणे आहे. विनापरवाना रॅली काढून जमावबंदी आदेशाचे व शासनाच्या कोव्हीड नियमाचे उल्लंघन केल्याप्रकरणी हा आरोप लावला असल्याचे सांगण्यात येत आहे.
 
 
यात आमदार श्वेता महाले, जिल्हा परिषद सदस्या डॉ. ज्योती खेडेकर, माजी नगराध्यक्षा प्रिया बोंद्रे, माजी नगरसेविका संगिता गाडेकर, मीनल गावंडे, नेहा खरात, किरण गाडेकर, विजया खडसन, सुरेखा पडघान, मनीषा सपकाळ यांच्यासह अनिकेत सावजी,अमोल खेडेकर व इतर ३० ते ३५ स्कुटी चालक महिलांचा समावेश आहे.
 
 
 
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121