उमेश कोल्हे हत्या प्रकरणात कट्टरतावादी संघटनांचा हात ?

    07-Aug-2022
Total Views |
 
umesh
 
 
 
अमरावती : राज्यभर गाजत असलेल्या उमेश कोल्हे प्रकरणात पीएफआय म्हणजे पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाच्या सहभागाची शक्यता आता पुढे आली आहे. उमेश कोल्हे हत्याप्रकरणातील अटक झालेल्या आरोपींचा पीएफआयशी संबंध असल्याचे एनआयएच्या तपासात समोर आले आहे. या प्रकरणातील प्रमुख आरोपींचा मौलवी मुश्फिक अहमद या कट्टरतावाद्याशी संबंध आहे. कोल्हे हत्याकांडाचा मास्टर माईंड इरफान शेख हा या मौलवी मुश्फिक अहमद याला आपला आदर्श मानतो.त्यामुळे आता त्या दिशेने तपास सुरु झाला आहे.
 
याच मौलवीने इरफान आणि त्याच्या साथीदारांचे डोके भडकावून, त्यांना चिथावून नुपूर शर्मा यांचे समाजमाध्यमांवर समर्थन करणाऱ्या उमेश कोल्हेची हत्या करण्यास प्रवृत्त्त केले होते. या हत्येनंतर झालेल्या बिर्याणी पार्टीतदेखील हा मौलवी सामील होता. याच प्रकरणात त्याचा अजून एक साथीदार म्हणजे अरबाज शेख याचेही नाव समोर आले आहे. मौलवी अहमद आणि अरबाज यांनीच उमेशच्या हत्येत आणि त्यानंतर लपून राहण्यासाठी आरोपींना मदत केली होती. मौलवी अहमद आणि अरबाज यांचे पीएफआयशी संबंध असल्याची माहिती समोर येत आहे.
 
 
व्यवसायाने औषध विक्रेते असलेल्या उमेश यांची नुपूर शर्मा यांचे समाजमाध्यमांवरून समर्थन केले म्हणून निर्घृण हत्या करण्यात आली होती. महाविकास आघाडीकडून लुटालुटीच्या उद्देशानेच ही हत्या झाल्याचे भासवण्यात येत होते पण त्यानंतर पोलिसांच्या तपासात खरे कारण उघडकीस आल्यानंतर केंद्रीय गृहमंत्रालयाने हा तपास एनआयए कडे सोपवला होता.