अमरावती पदवीधर मतदारसंघ निवडणुकीची घोषणा झाली! अशी आहे संपूर्ण प्रक्रीया

    05-Jan-2023
Total Views | 68
डॉ. दिलीप पांढरपट्टे
अमरावती : अमरावती विभाग पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी मतदान दि. ३० जानेवारीला सकाळी ८ ते दुपारी ४ वाजेपर्यंत व मतमोजणी २ फेब्रुवारीला होणार आहे. त्यादृष्टीने प्रशासनाकडून तयारी करण्यात आली असल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी विभागीय आयुक्त डॉ. दिलीप पांढरपट्टे यांनी आज येथे सांगितले. विभागीय आयुक्त कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. उपायुक्त संजय पवार, अजय लहाने, गजेंद्र बावणे, विजय भाकरे आदी उपस्थित होते.

डॉ. पांढरपट्टे म्हणाले की, निवडणुकीची अधिसूचना आज प्रसिद्ध करण्यात आली असून, नामनिर्देशन पत्रे स्वीकारण्यास सुरुवात झाली आहे. पहिल्या दिवशी एकही नामनिर्देशन प्राप्त नाही. नामनिर्देशन पत्रे दि. १२ जानेवारीपर्यंत स्वीकारण्यात येतील. त्यांची छाननी दि. १३ जानेवारीला होईल. उमेदवारी अर्ज दि. १६ जानेवारीपर्यंत मागे घेता येतील. निवडणूक प्रक्रिया दि. ४ फेब्रुवारीला पूर्ण करण्यात येईल.

मतदार संख्या

अंतिम मतदार यादीनुसार, अमरावती विभागात १ लाख २० हजार ९४४ पुरूष, ६४ हजार ९०६ महिला व इतर ७५ अशा एकूण १ लाख ८५ हजार ९२५ मतदारांची नोंदणी आहे. त्यात अमरावती जिल्ह्यात ३३ हजार २३६ पुरूष, २३ हजार ३२९ महिला, इतर ६४ असे एकूण ५६ हजार ६२९ पदवीधर मतदारांची नोंदणी झाली आहे. अकोला जिल्ह्यात २७ हजार ९४३ पुरूष, १६ हजार ५५२ महिला व ११ इतर असे एकूण ४४ हजार ५०६, तसेच बुलडाणा जिल्ह्यात २६ हजार १६१ पुरूष, १० हजार ३३६ महिला (इतर शून्य) असे एकूण ३६ हजार ४९७ मतदार नोंदणी आहे.

वाशिम जिल्ह्यात ११ हजार ७८ पुरूष, ३ हजार ९६६ महिला (इतर शून्य) असे एकूण १५ हजार ४४ आणि यवतमाळ जिल्ह्यात २२ हजार ५२६ पुरूष, १० हजार ७२३ महिला (इतर शून्य) एकूण ३३ हजार २४९ मतदारांची नोंदणी आहे.

मतदान केंद्रे

विभागात संभाव्य २६२ मतदान केंद्रे असतील. त्यात अमरावती जिल्ह्यात ७५, अकोला जिल्ह्यात ६१, बुलडाणा जिल्ह्यात ५२, वाशिम जिल्ह्यात २६ व यवतमाळ जिल्ह्यात ४८ केंद्रे असतील. निवडणूक प्रक्रियेसाठी नोडल अधिकाऱ्यांच्या नियुक्त्या यापूर्वीच करण्यात आल्या आहेत. मतदान केंद्राध्यक्ष म्हणून २८८, मतदान अधिकारी म्हणून १ हजार १५३ व सूक्ष्म निरीक्षक म्हणून २८९ अधिकारी व कर्मचाऱ्यांना जबाबदारी देण्यात येत आहे.

निवडणुकीदरम्यान मतदानाच्या प्रक्रियेबाबत भरीव जनजागृती करण्यात येईल जेणेकरून मतदान बाद होणार नाही. आदर्श आचारसंहितेचे पालन होण्याच्या दृष्टीने यंत्रणा सुसज्ज करण्यात आली आहे. निवडणूक प्रक्रियेदरम्यान कोविड-१९ बाबत मार्गदर्शक सूचनांचे पालन होणे आवश्यक आहे. मतमोजणीचे प्रशिक्षण, वाहतूक आराखडा, मतमोजणी केंद्र निश्चिती आदी प्रक्रिया सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. सहायक आयुक्त श्यामकांत म्हस्के, विवेकानंद काळकर, तहसीलदार वैशाली पाथरे, निकिता जावरकर, रवी महाले, नायब तहसीलदार मधुकर धुळे यांच्यासह अनेक अधिकारी उपस्थित होते.

दरम्यान, निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी आज राजकीय पक्षांची बैठक घेऊन त्यांना निवडणुकविषयक विविध बाबींची माहिती दिली, तसेच त्यांचे शंकानिरसन केले. विविध राजकीय पक्षांचे प्रतिनिधी यावेळी उपस्थित होते.
 
अग्रलेख
जरुर वाचा
पाक उच्चायुक्तालयातील दानिश निघाला ISI एजंट! गद्दारांकडून पाकिस्तानी व्हिसाच्या बदल्यात मागवायचा भारतीय सिमकार्ड

पाक उच्चायुक्तालयातील दानिश निघाला ISI एजंट! गद्दारांकडून पाकिस्तानी व्हिसाच्या बदल्यात मागवायचा भारतीय सिमकार्ड

(Pakistani High Commission official Danish was an ISI agent) ऑपरेशन सिंदूर राबवल्यानंतर भारताने देशाअंतर्गत पाकिस्तानसाठी हेरगिरी करणाऱ्या घरभेद्यांचा शोध सुरु केला. यामध्ये गेल्या आठवड्यात, पंजाब, हरियाणा आणि उत्तर प्रदेशसह वेगवेगळ्या राज्यांमधून अनेक व्यक्तींना अटक करण्यात आली आहे. हे सगळे पाकिस्तानी उच्चायुक्तालयात अधिकारी असणाऱ्या आणि आयएसआय एजंट एहसान उर रहीम उर्फ ​​दानिश आणि मुझम्मिल हुसेन उर्फ ​​सॅम हाश्मी यांच्या संपर्कात असल्याचे समोर आले आहे. या आरोपींना अटक केल्यानंतर, आयएसआय एजंट दानिश आणि ..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121