मुंबई : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत यांच्या वक्तव्याचा विपर्यास करणारे वृत्त प्रसिद्ध केल्याबद्दल भाजपचे नेते शिवराय कुळकर्णी यांनी ‘लोकसत्ता’च्या विरोधात पोलिसांकडे नुकतीच तक्रार दाखल केली आहे. अमरावतीच्या पोलीस आयुक्तांकडे लेखी तक्रार देत शिवराय कुळकर्णी यांनी ‘लोकसत्ता’चे संपादक आणि मालक यांच्यावर कारवाईची मागणी केली आहे.
“राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत यांनी केलेल्या भाषणानंतर ‘लोकसत्ता’ या वृत्तपत्राने जातीजातीत तेढ निर्माण करणारे वृत्त प्रकाशित केले. हे वृत्त खोटे, गैरसमज पसरवणारे, जातीय सद्भाव खराब करणारे आणि काही समाजघटकांचा अपमान करणारे असल्याने ’लोकसत्ता’चे संपादक आणि मालक यांच्यावर गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात यावी,” असे कुळकर्णी यांनी पोलीस आयुक्तांना दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे.