ऑस्करला गेलेल्या 'छेल्लो शो'मध्ये असे काय आहे?

"छेल्लो शो" आज सर्वत्र प्रदर्शित

    14-Oct-2022
Total Views | 58

chhello show
 
 
ऑस्कर पुरस्कारासाठी भारताकडून गेलेला चित्रपट म्हणजे 'छेल्लो शो'. हा चित्रपट आज १४ ऑक्टोबर रोजी देशभरात प्रदर्शित होत आहे. नुकतीच या चित्रपटाबाबत एक दुःखद माहिती समोर आली होती. ती म्हणजे या चित्रपटातील एक बालकलाकार राहुल कोळी याने काही दिवसांपूर्वीच वयाच्या अवघ्या १०व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. त्यामुळे चित्रपटातील सर्व कलाकारांवर शोकळला पसरली आहे. मात्र तरीही दुःखावर मात करत चित्रपटाची संपूर्ण टीम आज चित्रपट प्रदर्शनासाठी सज्ज झाली आहे.
 
 
'छेल्लो शो' हा चित्रपट ऑस्कर पुरस्कारासाठी नामांकन मिळवल्यापासूनच प्रचंड चर्चेत आला आहे. अनेक चित्रपटांना मागे टाकत ‘छेल्लो शो’ या गुजराती चित्रपटाने ऑस्करला जाण्याचा बहुमान मिळवल्याने नक्की या चित्रपटात असं काय खास आहे?, हे जाणून घेण्याची उत्सुकता प्रेक्षक वर्गाला लागून आहे. या चित्रपटातून लहान मुलांचं भावविश्वाचे दर्शन घडते.
 
 
एका नऊ वर्षांच्या मुलाची कथा म्हणजे 'छेल्लो शो'. एका खेडेगावात राहणारा 'समय' नावाचा एक मुलगा एकदा एक चित्रपट पाहतो. पण त्यानंतर मात्र चित्रपट नक्की बनतो कसा हे जाणून घेण्याचा ध्यास समयला लागतो. आपणही चित्रपट बनवायचा असं स्वप्न पाहत त्यासाठी तो कष्ट घेतो. प्रयत्नांची पराकाष्टा लावतो. त्याच्या याच जिद्दीची गोष्ट या चित्रपटात दाखवण्यात आली आहे.
 
 
 
 
 
या चित्रपटाचे एक महत्त्वाचे वैशिष्ट म्हणजे या चित्रपटात अगदी कमीत कमी संवादांचा वापर करत केवळ दृश्यांच्या आणि प्रकाशाच्या माध्यमातून समयची कथा सादर करण्यात आली आहे. तसेच चित्रपट पाहत असताना "आपलं जे स्वप्न पाहतो ते केवळ आपलं स्वप्नच नसतं, तर त्या स्वप्नात इतरांनाही सामील करून घेण्यात एका वेगळाच आनंद असतो", हे समयच्या प्रत्येक कृतीतून जाणवते.
 
 
‘छेल्लो शो’ हा गुजराती भाषिक चित्रपट असून 'लास्ट फिल्म शो' असे या चित्रपटाचे इंग्रजी नामकरण करण्यात आले आहे. मधील काळात लॉकडाऊन असल्यामुळे या चित्रपटाला प्रेक्षकांपर्यंत पोहोचण्यास उशिर झाला. आजवर या चित्रपटाने अनेक पुरस्कार पटकावले आहेत. पान नलिन यांच्या या चित्रपटामध्ये भावेश श्रीमाली, भाविन राबरी, ऋचा मीणा, परेश मेहता आणि दीपेन रावल मुख्य भूमिकेत आपल्या पाहण्यास मिळणार आहेत.
 
 
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121