नवी दिल्ली : खलिस्तानी संघटनेचे प्रमुख गुरुपतवंत सिंग पन्नूने २० जानेवारी २०२२ रोजी एक व्हिडिओ प्रसिद्ध केला. त्यामध्ये त्याने तथाकथित 'काश्मिरी स्वातंत्र्यसैनिकांना' प्रजासत्ताक दिनानिमित्त काश्मीर सोडून दिल्ली गाठण्याचे आवाहन केले. व्हिडिओमध्ये पन्नूने देश तोडण्याचा प्रयत्न करणाऱ्या फुटीरतावादी आणि दहशतवाद्यांना 'स्वातंत्र्य सैनिक' म्हंटले आहे. त्यांचे विधान खलिस्तानसाठी 'आता किंवा कधीच नाही' या धर्तीवर होते. या व्हिडियोच्या सुरुवातीला बुरखा घातलेली एक महिला दिसते. यामध्ये ती म्हणते, “२६ जानेवारीला आम्ही काश्मीर आणि खलिस्तानचा झेंडा फडकावून मोदी आणि तिरंग्याचा मार्ग रोखू. २६ जानेवारीला दिल्लीला पोहोच. काश्मीर आणि खलिस्तान स्वतंत्र करा." असा संदेश देते.
यावेळी पन्नूने म्हंटले आहेत की, “हा संदेश काश्मिरी लोकांसाठी आणि भारतीय सैन्याचा सामना करणाऱ्या स्वातंत्र्य सैनिकांसाठी आहे. हा संदेश काश्मीरमधील त्या लोकांसाठी आहे, ज्यांना भारतीय संविधान आणि भारतीय सैन्य बनावट चकमकीत मारत आहे. तथाकथित स्वातंत्र्य सैनिकांची ही वेळ आहे. ही वेळ काश्मीरच्या जनतेची आहे. तुम्ही सर्वजण २६ जानेवारीला दिल्लीत या आणि मोदी, तिरंगा रोखा. जिथे शीख समुदाय खलिस्तानचा झेंडा फडकवत आहे, तिथे तुम्ही काश्मीरचा झेंडा फडकावा."
पुढे पन्नूने व्हिडियोमध्ये म्हंटले आहे की, "बारामुल्ला, अनंतनाग आणि शोपियानमध्ये दररोज तुम्हाला खोट्या चकमकीत मारले जात असल्याची बातमी जगात कुणालाही नाही. पण २६ जानेवारीला दिल्लीला पोहोचल्यावर काश्मीरला स्वातंत्र्य हवे आहे हे जगाला दिसेल. २६ जानेवारीला दिल्लीला या. शीखांना स्वातंत्र्य हवे आहे. आता नाही तर कधीच नाही. त्याच्या भाषणादरम्यान इस्लामिक दहशतवाद्यांनाही व्हिडिओमध्ये दाखवण्यात आले आहे.