मुंबई : छोट्या तसेच मोठ्या पडद्यावर सुप्रसिद्ध अभिनेत्री गौहर खान आता वेगळ्याच कारणाने चर्चेत आली आहे. तिने 'समान नागरी संहिता' (युसीसी)च्या मागणीला विरोध दर्शवला. उद्योजिका आशा जडेजा मोटवानी यांनी ट्विट केले होते की, "बाहेरच्या दुनियेत हे कोणालामाहिती नाही की, भारतात अजूनही हिंदू आणि मुस्लिमांसाठी वेगवेगळे कौटुंबिक कायदे आहेत. हिंदूंना धर्मनिरपेक्ष कायद्याचे पालन करावे लागते." यावेळी गौहर खानने म्हंटले की, "ती मुस्लीम आहे, आणि त्यांच्या अधिकारांवर कोणीही बंधने घालू शकत नाही."
उद्योजिका आशा जडेजा मोटवानी यांनी ट्विटमध्ये म्हंटले की, "भारतातील प्रत्येक नागरिकासाठी समान कायदा म्हणजेच युसीसी लागू करावा. हिंदूंनी धर्मनिरपेक्ष नियमांचे पालन केले पाहिजे. मुस्लिम ४ बायका ठेवू शकतात आणि शरियाच्या नावावर त्यांच्या बायका आणि मुलींच्या शिक्षणावर बंदी घालू शकतात. 'समान नागरी संहिता' सर्व भारतीयांना लागू करणे आवश्यक आहे."
त्यांनी केलेल्या या ट्विटला उत्तर देताना अभिनेत्री गौहर खानने म्हंटले की, "मी मुस्लीम आहे आणि कोणतीही संस्था आम्हाला आमचे हक्क मिळवण्यावर बंदी घालू शकत नाही. भारत हा धर्मनिरपेक्ष आहे आणि ही लोकशाही आहे. तुमच्यासारखी हुकूमशाही नाही. त्यामुळे तुमच्या अमेरिकन स्टेटसमध्ये आरामात राहा आणि माझ्या देशात द्वेष भडकवणे थांबवा!" असे म्हणत तिने युसीसीला विरोध दर्शवला.
गौहर खान ही एके काळी अभिनेता कुशल टंडनसोबत रिलेशनशिपमध्ये होती. पण त्यानंतर कुशल टंडनने सांगितले होते की, गौहर खानसोबत नेहमीच धर्मावरून भांडण होत असे. कुशलने धर्मांतर करून मुस्लिम व्हावे, अशी गौहर खानची इच्छा होती. परंतु, त्यांने इस्लाम न स्वीकारल्यामुळे हे नाते तुटले. हे दोघे २०१३मध्ये 'बिग बॉस ७' मध्ये एकत्र आले होते. पण, गौहर खानच्या कट्टरवादी इस्लामिक विचारसरणीमुळे हे नाते तुटल्याचे स्वतः कुशल टंडनने सांगितले होते.