आयपीएलमध्ये आणखी २ संघाचा समावेश : बीसीसीआयची घोषणा

आयपीएलमध्ये आणखी २ संघाचा समावेश : बीसीसीआयची घोषणा

    01-Sep-2021
Total Views | 223

bcci_1  H x W:
मुंबई : आयपीएलचे २०२१चे पर्व अजून संपले नाही, आणि तोच आता बीसीसीआयने एक मोठी घोषणा केली आहे. येत्या आगामी आयपीएलमध्ये आणखी २ नवे संघ जोडणार असल्याची घोषणा अखेर बीसीसीआयने केली आहे. या दोन संघासाठी बेस प्राईज तब्बल २००० कोटी इतकी निश्चित केली आहे. तर बीसीसीआयला अपेक्षा आहे की, जेव्हा या संघांवर बोली लागेल तेव्हा ती ५००० कोटींपर्यंत जाईल. टेंडर खरेदी करण्याची अंतिम तारीख ५ ऑक्टोबर निश्चित करण्यात आली आहे.
 
 
 
 
 
नव्या संघांचा समावेश होताच आयपीएलमध्ये ७४ सामने खेळवण्यात येणार आहे. आयपीएलच्या गव्हर्निंग काऊन्सिलने टेंडर प्रक्रियेद्वारे बोली आमंत्रित केल्या आहेत. यामध्ये काही नियम आणि अटी घालण्यात आल्या आहेत. पात्रता सिद्ध करणे, बोली सादर करण्याची प्रक्रिया, प्रस्तावित नवीन संघांचे अधिकार आणि दायित्वे इत्यादी घटक टेंडर इंव्हीटेशन’मध्ये समाविष्ट आहे, जे नॉन-रिफंडेबल शुल्काची भरपाई मिळाल्यावर उपलब्ध केले जातील. हे शुल्क १० लाख रुपये इतके असेल. तसेच यामध्ये वस्तू आणि सेवा कराचाही समावेश आहे.
 
 
मिळालेल्या माहितीनुसार, बीसीसीआयला आशा आहे की या खरेदीमध्ये ५००० कोटी रूपयांपर्यंत मिळकत येईल. आयपीएलच्या पुढील हंगामात ७४ सामने होणार असून ही प्रत्येकासाठी 'विन-विन' स्थिती आहे. दरम्यान, आयपीएलमध्ये फ्रेचायझी मिळवण्यासाठी अनेक मोठी नवे चर्चेत आहेत. यामध्ये अदानी ग्रुप, आरपीजी संजीव गोयनका, फार्मासिटिक कंपनी टोरेंट आणि एका बँकेचा समावेश आहे. दुसरीकडे नवीन संघांसाठी ५ ते ६ शहरांची नवे प्रामुख्याने घेतली जात आहे. यामध्ये अहमदाबाद, लखनौ, कटक, गुवाहटी आणि पुणे या शहरांची नावे शर्यतीत आहेत.
 
 
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121