न्यायमूर्तींच्या नियुक्तीचे पावित्र्य जपा सरन्यायाधीशांच्या प्रसारमाध्यमांना कानपिचक्या

    19-Aug-2021
Total Views | 137
 ram456_1  H x W
 
 
न्यायमूर्तींच्या नियुक्तीचे पावित्र्य जपा सरन्यायाधीशांच्या प्रसारमाध्यमांना कानपिचक्या
 
 
नवी दिल्ली : “न्यायमूर्तींच्या नियुक्तीची प्रक्रिया ही पवित्र असून त्याची एक प्रतिष्ठा आहे. प्रसारमाध्यमांनी त्या प्रक्रियेचे पावित्र्य समजून घेण्याची आणि जपण्याची गरज आहे,” अशा शब्दांत सरन्यायाधीश एन. व्ही. रामण्णा यांनी प्रसारमाध्यमांना बुधवार, दि. १८ ऑगस्ट रोजी कानपिचक्या दिल्या. दरम्यान, सर्वोच्च न्यायालयाच्या संकेतस्थळावर सायंकाळी कलोजियमने शिफारस केलेल्या नऊ जणांची नावे प्रकाशित करण्यात आली.काही निवडक प्रसारमाध्यमांनी सरन्यायाधीश न्यायमूर्ती एन. व्ही. रामण्णा यांच्या नेतृत्वाखालील कलोजियमने सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्ती पदांसाठी नऊ नावांना अंतिम स्वरूप दिल्याचे वृत्त प्रसारित केले होते. त्याविषयी सरन्यायाधीशांनी तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त केली.
 
 
ते म्हणाले, “न्यायमूर्तींच्या नियुक्तीची प्रक्रिया ही पवित्र असून त्याची एक प्रतिष्ठा आहे. न्यायमूर्तींच्या नियुक्तीचे पावित्र्य जपा प्रसारमाध्यमांनी त्या प्रक्रियेचे पावित्र्य समजून घेण्याची आणि जपण्याची गरज आहे. कोणत्याही नियुक्त्यांची घोषणा झालेली नसताना त्याविषयी प्रतिकूल टिप्पण्या करणे हे अत्यंत चुकीचे आहे. अशा प्रकारच्या बेजबाबदार वार्तांकनामुळे आणि अटकळी बांधण्याच्या प्रकारांमुळे प्रतिभावान व्यक्तींच्या कारकिर्दीस आघात बसण्याची अनेक उदाहरणे आहेत. त्यामुळे याविषयी मी अतिशय चिंतेत आहे. न्यायमूर्तींच्या नियुक्तीची प्रक्रिया अद्याप सुरू आहे. बैठकी होतील आणि त्यानंतर निर्णय घेतला जाईल. सर्वोच्च न्यायालय प्रसारमाध्यमांच्या स्वातंत्र्यास आणि नागरिकांच्या हक्कांना सर्वोच्च सन्मान देते.
 
त्यामुळे सर्वांकडून न्यायसंस्थेचे अखंडत्व आणि प्रतिष्ठा राखली जाण्याची आपण अपेक्षा करीत असल्याचेही सरन्यायाधीश यावेळी म्हणाले.दरम्यान, सर्वोच्च न्यायालयाच्या संकेतस्थळावर सायंकाळी कलोजियमने शिफासर केलेल्या नऊ जणांची नावे प्रकाशित करण्यात आली.
 
 
त्यामध्ये कर्नाटक उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश न्या. ए. एस. ओका, गुजरात उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश न्या. जे. के. माहेश्वरी, तेलंगण उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीश न्या. हिमा कोहली, कर्नाटक उच्च न्यायालयातील न्यायाधीश न्या. बी. व्ही. नागरत्ना, केरळ उच्च न्यायालयातील न्यायाधीश न्या. सी. टी. रविकुमार, मद्रास उच्च न्यायालयातील न्यायाधीश न्या. एम. एम. सुंदरेश, गुजरात उच्च न्यायालयातील न्यायाधीश न्या. बेला एम. त्रिवेदी आणि वरिष्ठ वकील पी. एस. नरसिंम्हा यांचा समावेश आहे.
 
 
 
 
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121