कोल्हापूरचे नाव 'कलापूर' करावे : सचिन पिळगावकर

    12-Aug-2021
Total Views | 251

Sachin_1  H x W
मुंबई : मराठी तसेच सध्या हिंदी चित्रपटामध्ये सुप्रसिद्ध असलेले अभिनेते सचिन पिळगावकर यांची 'सिटी ऑफ ड्रीम्स'मधील कमाला चांगलीच पसंती मिळत आहे. याबद्दल एका मुलाखतीमध्ये बोलताना त्यांनी "कोल्हापूरचे नाव 'कलापूर' करावे" अशी मागणी केली आहे. एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीमध्ये त्यांनी याची काही कारणे सांगितली.
 
 
सचिन पिळगावकर यांनी सांगितले की, "कोल्हापूर हे त्या जागेचे नाव कधीच नव्हते. तिथे चित्रपटसृष्टी होती. तिथे कलावंत होते. सर्व प्रकारचे कलाकार तिथं राहत होते. त्यामुळे त्या जागेचे नाव कलापूर होते. इंग्रजांनी त्या नावाला वेगळ्या पद्धतीने उच्चारत कोल्हापूर केले. जसे मुंबईला एवढे नाव चांगले असताना 'बॉम्बे' केले. माझी इच्छा आहे की पुन्हा एकदा कोल्हापूरचे नाव कलापूर व्हावे. यासाठी मी प्रयत्न करत राहणार."
 
 
पुढे ते म्हणाले की, "आजचे प्रेक्षक हे सुजाण झाले आहेत. ते अधिक दक्ष होऊ लागले आहेत. आपली सर्व मनोरंजन सृष्टी त्यांनी दिलेल्या पोचपावतीवर अवलंबून असते. ते जेवढे दक्ष होतील तेवढेच मनोरंजन क्षेत्रात नवनवे बदल होत जाणार. आत 'काहीही' करून उपयोगाचे नाही, कारण प्रेक्षक चुका लगेच पकडतात. हा बदल प्रेक्षकांमध्ये आधी झाला नंतर आमच्यामध्ये बदल झाला. आधी प्रेक्षक सुधरले आणि प्रेक्षकांनी आम्हाला बदलवले. आज डिजिटल स्वरुप झालंय पण आधीसारखी मजा नाही. मात्र याचा अर्थ असा नाही नवीन गोष्टींना मी मानत नाही. मला आज ५८ वर्ष या क्षेत्रात झाली आहेत. या काळात मी नवीन प्रयोग करत राहिलो. मी अजूनही शिकतो आहे."
 
 
अग्रलेख
जरुर वाचा
चैरेवेति चैरेवेति मंत्राचे मूर्तिमंत उदाहरण ; प्रमिलताई मेढे

चैरेवेति चैरेवेति मंत्राचे मूर्तिमंत उदाहरण ; प्रमिलताई मेढे

राष्ट्र सेविका समिती’च्या केंद्रीय कार्यालय प्रमुख, अखिल भारतीय कार्यकारी, जागतिक विभाग प्रमुख, सह-कार्यवाहिका (२००३ ते २००६) आणि प्रमुख संचालिका (२००६ ते २०१२) अशा विविध जबाबदार्‍या प्रमिलताईंनी यशस्वीरित्या सांभाळल्या. त्यांनी देशभरात आणि परदेशातही प्रवास केला, ज्यात श्रीलंका, केनिया, युनायटेड किंग्डम, अमेरिका इत्यादी देशांचा समावेश आहे. अमेरिकेतील प्रवासादरम्यान त्यांना न्यू जर्सीचे मानद नागरिकत्वही मिळाले होते. २०२० साली ‘एसएनडीटी’ विद्यापीठाने त्यांना ‘डी. लिट’ ही मानद पदवी प्रदान करण्यात आली...

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121