विधानपरिषद विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी घेतली स्वप्निल लोणकर कुटुंबियांची भेट
पुणे: एमपीएससीच्या गोंधळाला कंटाळून आत्महत्येचे पाऊल उचललेल्या पुणे येथील विद्यार्थी स्वप्निल लोणकर यांच्या कुटुंबियांची विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर आज पुणे मधील फुरसुंगी येथील त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली. प्रसिध्दी माध्यमांशी बोलताना दरेकर यांनी सांगितले की, ज्या विद्यार्थ्यांच्या मुख्य परिक्षा झाल्या आहेत व जे मुलाखतीमध्ये उत्तीर्ण झाले आहेत, अशा विद्यार्थ्यांना नियुक्त्या द्याव्यात. त्यामुळे स्वप्निल सारख्या अन्य विद्यार्थ्यांचे नुकसान होणार नाही यादृष्टीने सरकारने तातडीने पावले उचलावीत.
यावेळी बोलताना ते म्हणाले, आज प्रत्येक कुटुंबात घुसमटलेला स्वप्निल आहे. त्यामुळे सरकारने एमपीएससीच्या उमेदवारांच्या नियुक्ता करेपर्यंत आणखी निष्पाप स्वप्निलचे बळी घेऊ नयेत. सरकारने तातडीने आयोगाचे सदस्य नियुक्त करुन एमपीएससी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना तात्काळ नियुक्त्या दिल्या पाहिजेत अशी मागणी विधानपरिषदेचे विरोधी पक्ष नेते प्रविण दरेकर यांनी आज केली. त्यांच्या कुटुंबियांचे सांत्वन करुन त्यांना धीर दिला. लोणकर कुटुंबियांच्या पाठीशी आम्ही ठामपणे उभे असून त्यांना शासन दरबारी न्याय मिळवून देण्याचे आश्वासन यावेळी दरेकर यांनी त्यांच्या कुटुंबियांना दिले.
...तर जनतेसाठी रेल रोको करु; प्रविण दरेकर यांचा इशारा
लसीकरणाचे दोन डोस घेतलेल्यांना प्रवाश्यांना लोकल सेवेसाठी परवानगी देण्याची मागणी आपण मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्याकडे केली. त्यानंतर यासंदर्भात सकारत्मक विचार करण्याचे आश्वासनही मुख्यमंत्र्यांनी आपणांस दिले. परंतु आजच्या राज्य मंत्रीमंडळाच्या बैठकीत याबाबत काहीच निर्णय झालेला नाही. त्यामुळे लोकल सुरु करण्याबाबत सरकारने दोन-चार दिवसात निर्णय घेतला नाही. तरीही या भूमिकेपासून आपण हटणार नाही व जनतेसाठी रेल रोको करावा लागला तर त्यासाठी आपण रेल्वेच्या ट्रँक वर उतरु असा इशारा विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते प्रविण दरेकर यांनी दिला.