नवी दिल्ली : दाक्षिणात्य सुपरस्टार रजनीकांत यांनी अखेर राजकारणाला पूर्णविराम देत भविष्यातही राजकारणात येईन असे वाटत नाही, असे स्पष्ट केले आहे. तसेच, त्यांनी आपली ‘रजनी मक्कल मंद्रम’ ही आपली संघटना बरखास्त केले आहे. गेले काही महीने रजनीकांत राजकारणामध्ये प्रवेश करणार अशा चर्चा रंगल्या होत्या. ते कोणत्या पक्षाला पाठींबा देणार? अशा तर्क- वितर्कांना अखेर पूर्णविराम लागला आहे. त्यांनी एक विधान जाहीर करत ही घोषणा केली आहे.
रजनीकांत यांनी त्यांच्या रजनी मक्कल मंद्रम या संघटनेच्या सदस्यांसोबत चर्चा केल्यानंतर हा निर्णय जाहीर केला. ‘भविष्यातही आपला राजकारणात येण्याचा विचार नाही, असे रजनीकांत यांनी या बैठकीनंतर स्पष्ट केले आहे. तसेच आपली रजनी मक्कल मंद्रम ही संघटनाही बरखास्त करण्याचा निर्णय घेतला आहे. ही संघटना रजनीकांत नरपनी मंद्रममध्ये किंवा रजनीकांत यांच्या चाहत्यांसाठीच्या संघटनेत विलीन होईल, असेही त्यांनी सांगितले आहे.