मुंबई : महाराष्ट्रातील एकूण १८ जिल्ह्यांमध्ये आता टाळेबंदी उठविली जाणार आहे. दिनांक ७ जून पासून १८ जिल्ह्यांमध्ये असणारे लॉकडाऊन उठवले जाणार आहे. 'मदत आणि पुनर्वसन मंत्री ''विजय वडेट्टीवार' यांनी केलेले वक्तव्य हे खरे ठरले आहे.कोरोना पॉझिटिव्हिटी दर आणि उपलब्ध बेडची संख्या या दोन निकषावर हा लॉकडाउन उठविला जाणार आहे. एकूण पाच स्तर यासाठी नियोजीले गेले आहेत. ५ टक्के पॉझिटिव्हिटी दर आणि २५ ते ४० टक्के ऑक्सिजन बेडची उपलब्धता असणाऱ्या जिल्ह्याना यामुळे मोठा दिलासा मिळणार आहे. सोमवारपासून या निर्णयाची सर्व जिल्ह्यात अंमलबजावणी केली जाणार आहे .
पहिला स्तर आहे करोना पॉझिटिव्हिटी दर ५ टक्के आणि २५ टक्केपेक्षा कमी ऑक्सिजन बेड भरलेले असतील असे जिल्हे या पहिल्या स्तरातील जिल्हे - अहमदनगर, भंडारा, बुलढाणा, चंद्रपूर, धुळे, गोंदिया, जळगाव, जालना, लातूर, नागपूर, नांदेड, ठाणे, वर्धा तर दुसऱ्या स्तरात पॉझिटिव्हिटी दर ५ टक्के आणि २५ ते ४० टक्क्यांपर्यंत ऑक्सिजन बेड्स भरले आहेत असे जिल्हे यात औरंगाबाद, गडचिरोली, हिंगोली, मुंबई शहर, मुंबई उपनगर, नंदूरबार, नाशिक, उस्मानाबाद, पालघर, परभणी इत्यादी जिल्ह्यांचा समावेश होतो.
तिसऱ्या स्तरात पॉझिटिव्हिटी दर ५ ते १० टक्के किंवा ४० टक्क्यांपेक्षा अधिक ऑक्सिजन बेड व्यापले आहेत असे जिल्हे.तिसऱ्या स्तरातील जिल्ह्यात अकोला, अमरावती, बीड, पुणे, वाशिम, यवतमाळ इत्यादी जिल्ह्यांचा समावेश होतो . चौथ्या स्तरात पॉझिटिव्हिटी दर १० ते २० टक्क्यांदरम्यान किंवा ऑक्सिजन बेड्स ६० टक्क्यांपेक्षा अधिक भरले आहेत असे जिल्हे यात रायगड, रत्नागिरी, सांगली, सिंधुदुर्ग इत्यादी जिल्ह्यांचा समावेश होतो. पाचव्या स्तरात कोणत्याही जिल्ह्याचा समावेश होत नाही .
पहिल्या स्तरात आणि दुसऱ्या स्तरात असणाऱ्या जिल्ह्यातील दुकाने चालू असतील तर तिसऱ्या आणि चौथ्या स्तरातील जिल्ह्यांमध्ये दुपारी ४ पर्यंतच चालू राहतील. उर्वरित स्तरात शनिवार आणि रविवारी बंद ठेवण्यास सांग्यात येणार आहे. ट्रेन पहिल्या स्तरातील जिल्ह्यामध्ये सर्वाना चालू होईल तर दुसऱ्या स्तरातील जिल्ह्यांमध्ये अत्यावश्यक सेवेत असणाऱ्या कर्मचाऱ्यांनाच फक्त ट्रेन चा प्रवास करता येईल. याबरोबरच अनेक नवीन नियम या स्तरांना केंद्रस्थानी ठेवून घेतले गेले आहेत. मुंबई हे शहर दुसऱ्या सत्रात मोडते असे मुंबईचे महापौर किशोरी पेडणेकर यांनी सांगितले आहे. याबाबत काही दिवसांपूर्वी 'विजय वडेट्टीवार'यांनी केले होते ते खरे ठरले आहे .