आंदोलनात सहभागी झाल्याने कोटकरवर सूड उगवला का?

    16-Jun-2021
Total Views | 131

pravin darekar_1 &nb
 
 
विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांचा सवाल
 
 
मुंबई : शिवसेनेचे नेते आणि नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांच्याविरुद्ध समाजमाध्यमांवर आक्षेपार्ह मजकूर लिहिल्याप्रकरणी मराठी अभिनेता मयुरेश कोटकरला अटक करण्यात आली. याप्रकरणी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी राज्य सरकारवर निशाणा साधला आहे. “नवी मुंबई विमानतळ नामकरण आंदोलनात सहभागी झाल्यामुळे मयुरेश कोटकर यांच्यावर सूड उगवला जात नाही ना,” असा सवाल दरेकर यांनी केला आहे.


ते म्हणाले, “लोकशाहीत अभिव्यक्तिस्वातंत्र्याचे ढोल पिटत असताना कोटकर नावाच्या व्यक्तीला अशाप्रकारे अटक करणे निंदनीय आहे. कोटकर हा नवी मुंबई विमानतळाला दि. बा. पाटील यांचे नाव देण्यात यावे, ही मागणी करणार्‍या आंदोलनात सहभागी होता. फेसबुकच्या माध्यमातून अनेकजण बोलत असतात, व्यक्त होत असतात. पण केवळ आपल्याबद्दल बोलले म्हणून त्याच्यावर गुन्हे दाखल करा, अटक करा हे चूक आहे. ठाण्यातील करमुसे प्रकरण, काल-परवा दिलीप लांडेंनी कंत्राटदारावर कचरा टाकण्याचे प्रकरण आणि आता हे प्रकरण. या सगळ्याचा मी निषेध करतो,’ असे ते म्हणाले.
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121