आयपीएल २०२१चे उर्वरित सामने युएईत

    29-May-2021
Total Views | 70

BCCI_1  H x W:
 
 

मुंबई : शनिवारी बीसीसीआयची ऑनलाइन बैठक पार पडली. यामध्ये कोरोनामुळे स्थगित झालेले उर्वरित आयपीएल २०२१चे सामने आता सप्टेंबर ते ऑक्टोबर दरम्यान संयुक्त अरब अमरीती (युएई)मध्ये घेणार असल्याचे यावेळी बीसीसीआय जाहीर केले. विशेष म्हणजे कोरोनाकाळात आयपीएल २०२०ची स्पर्धा ही युएईमध्येच यशस्वीरित्या पार पडली होती. तसेच, पुढेही कोरोनाचे सर्व निर्बध पळून हे सामने होणार असल्याचेदेखील बीसीसीआयने स्पष्ट केले आहे. बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुलीच्या नेतृत्वाखाली झालेल्या ऑनलाइन बैठकीत हे निर्णय घेण्यात आलेले आहेत.
 
 
 
बीसीसीआयने दिलेल्या माहितीनुसार, देशात होणाऱ्या आयपीएल २०२१च्या बायो बबलमध्ये अनेक खेळाडू आणि सदस्यांना कोरोनाची लागण झाली होती. यामुळे ४ मे रोजी सर्व उर्वरित सामने हे स्थगित करण्यात आले होते. अध्यक्ष सौरव गांगुलीने पुढील सामने हे भारतात होणार नाहीत, असे स्पष्ट केले होते. त्यानंतर शनिवारी उर्वरित ३१ सामने हे युएईमध्ये घेण्याचा निर्णय बीसीसीआयकडून घेण्यात आला. हा दुसरा टप्पा साधारण १८ किंवा १९ सप्टेंबरला चालू होऊन १० ऑक्टोबरपर्यंत संपेल, असे आयोजन करण्यात येईल असे साग्न्यात येत आहे. अधिकृतरित्या बीसीसीआय काही दिवसांमध्ये याबाबतचे पुढील तपशील जाहीर करेल.
 
 
अग्रलेख
जरुर वाचा
भारतीय जनता पार्टी द्वारे शासकीय दाखले शिबिर संपन्न

भारतीय जनता पार्टी द्वारे शासकीय दाखले शिबिर संपन्न

वसई विरार शहर महापालिका क्षेत्रातील दहावी व बारावी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना विविध शासकीय दाखल्यांची अत्यंत गरज भासत असते. त्यासाठी त्यांना व त्यांच्या पालकांना शासकीय कार्यालयात हेलपाटे मारावे लागतात. वसई तहसीलदार ऑफिसला जाणे गरीब व गरजू विद्यार्थ्यांना शक्य होत नसल्याने ही गैरसोय टाळण्यासाठी भारतीय जनता पक्षाद्वारे वसई तहसील कार्यालयाकडील उत्पन्न दाखले, अधिवास दाखले, क्रिमिलेअर दाखले, ज्येष्ठ नागरिक दाखले, रेशन कार्ड ऑनलाइन करून घेणे अशा विविध कामकाजाचे शिबिर शनिवार १४ जून रोजी कातकरीपाडा, चंदनसार..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121