वाह...रे अभिव्यक्तिस्वातंत्र्य !

    22-May-2021
Total Views | 675

chitra wagh _1  



मुंबई
: भाजपा युवामोर्चा सचिव अॅड. प्रदीप गावडे यांना मुंबई पोलिसांनी शनिवारी सकाळी पुणे येथून बेकायदेशीररित्या ताब्यात घेतले आहे. गावडे यांना कोणत्याही प्रकारची नोटीस न पाठवताच पोलिसांनी सदर कारवाई केली आहे.भाजपा युवा मोर्चाचे सचिव अॅड. प्रदीप गावडे यांना वांद्रे पश्चिम, सायबर शाखेतर्फे बेकायदेशीररित्या ताब्यात घेण्यात आले आहे. यावरूनच भाजपने ठाकरे सरकारवर निशाणा साधण्यास सुरुवात केली आहे. 'राष्ट्रवादीच्या बलात्काराचा आरोप असणाऱ्या कार्यकर्त्याला अटक करण्याचे धारिष्ट्य दाखवा. वाह रे अभिव्यक्ती स्वातंत्र्य...' असे म्हणत भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी महाविकास आघाडी सरकारवर निशाणा साधला आहे.

चित्रा वाघ यांनी ट्विट करत म्हणले आहे की,"भाजपचे प्रदीप गावडेना मुंबई पोलिसांनी सोशलमिडीयावर व्यक्त झाल्याने बेकायदेशीरपणे अटक केली पण ५ महिन्यांपुर्वी राष्ट्रवादीचा युवकध्यक्ष मेहबूब शेखवर कायदेशीर बलात्काराचा गुन्हा दाखल असूनही त्याला अटक करायच धारीष्ट्य महाराष्ट्र पोलिसांनी अद्याप दाखवलं नाही वाह...रे अभिव्यक्तिस्वातंत्र्य" असे म्हणत त्यांनी ठाकरे सरकारवर निशाणा साधला आहे.


दरम्यान गावडे यांना मुंबई पोलिसांनी शनिवारी सकाळी पुणे येथून ताब्यात घेतले असून त्यांना आता मुंबई येथे नेण्यात आहे. मात्र, गावडे यांना ताब्यात घेताना पोलिसांना त्यांना कोणत्याही प्रकारची नोटीस दिलेली नाही अथवा एफआयआरची प्रतदेखील दिलेली नाही. त्यांच्याविरोधात भादंवि कलम २९५ अ, ५०० आणि ५०५२ कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आल्याचे समजते.


शरद पवार यांच्यावर टीका केल्यानेच कारवाई :  गावडे


याविषयी अॅड. प्रदीप गावडे यांच्याशी संपर्क केला असता त्यांना राजकीय हेतूने ही कारवाई होत असल्याचे सांगितले. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, आमदार रोहीत पवार यांच्यावर टिका केल्याने माझ्याविरोधात ही कारवाई होत आहे. त्याचप्रमाणे काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसशी संबंधित ५४ सोशल मिडीया प्रोफाईलविरोधात मी तक्रार दाखल केली होती, त्यामुळे मला लक्ष्य करण्यात येत असल्याचे गावडे यांनी सांगितले आहे. दरम्यान, मुंबई येथील राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्याने १३ मे रोजी एफआयआर दाखल केल्याचीही माहिती गावडे यांनी दिली.

अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121