"गायकवाड पहिला प्रयोग तुझ्या घरकोंबड्यावर कर"

    18-Apr-2021
Total Views | 614

nitesh rane _1  




महाविकास आघाडीतील नेत्यांचा राणे स्टाईल कार्यक्रम

मुंबई : माजी मुख्यमंत्री व राज्याचे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्या तोंडात कोरोनाचा जंतू कोंबण्याची भाषा करणाऱ्या बुलडाण्याचे शिवसेना आमदार संजय गायकवाड यांचा भाजप आमदार नितेश राणे यांनी चांगलाच समाचार घेतला आहे. "देवेंद्रजींच्या जवळ जाणे हे तर लांबच राहिले. हे या गायकवाडला कोण सांगेल. पहिला प्रयोग तुझ्या घर कोंबडा मुख्यमंत्र्यावर कर आणि मग बाकीचे बघू. जंतू पार्सल पाठवतो मातोश्री वर. कुठे घालायची तिथे घाल.", असा खास शैलीत त्यांनी गायकवाड यांचा समाचार घेतला आहे.
 
 
 
राज्यात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव असताना औषधांचा तुटवडा भासू लागला आहे. राज्यातील आरोग्य व्यवस्था व्हेंटीलेटरवर असल्याचे चित्र आहे. लक्षणे रुग्णांना घरी पाठवून देण्याचे प्रकार सुरू झाले आहेत. मात्र, राज्यातील सत्ताधारी प्रत्येक बाबतीत केंद्र सरकार आणि राज्यातील भाजप नेत्यांवर टीका करत आहेत. असाच प्रकार बुलडाणा आमदार संजय गायकवाड यांनी केला. त्यांनी टीका करताना सर्व पातळी सोडली.
 
 
फडणवीस, दरेकर आणि चंपा नावाचे चंद्रकांत पाटील हे राजकारण करत आहेत. करोना हा पक्षाचा कार्यकर्ता पाहून होत नाही. शिवसेना, राष्ट्रवादी पाहून होत नाही. प्रत्येक जातीधर्माच्या माणसाला हा विषाणू विळखा घालून बसला आहे, असे म्हणत असताना त्यांची जीभ घसरली.
 
 
 
याचाच समाचार नितेश राणे यांनी घेतला आहे. तसेच राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री व राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांच्यावरही राणेंनी टीका केली. "नवाब भाईंनी जावईला कमी भेटाव. काहीही बोलतात आजकाल. शुध्दीत आहेत का??.. हा प्रश्न पडतो!!", असे राणे म्हणाले. 
 
 
 
राज्यातील भाजपच्या कुठल्याही नेत्याला त्यांच्या मतदार संघात रेमडेसिवीर देऊ नका, असा फोन 'बेबी पेंग्विन' आणि त्यांच्या 'नाईट लाईफ गँग'तर्फे येत असल्याची माहिती काही आतल्या अधिकाऱ्यांनी दिल्याचा गौप्यस्फोटही राणे यांनी केला आहे. राज्यात रुग्णांना गरज असताना अशाप्रकारे औषधवाटपासाठी आडकाठी घालणे हा घृणास्पद प्रकार असल्याची टीका त्यांनी सरकारवर व्यक्त केली आहे.
 
 
 
स्वतः करायचे नाही आणि दुसरे करत असतील, तर करु द्यायचे नाही. तुमच्यात हिंमत असेल तर न रडता ५० हजार रेमडीसीवीर जनतेसाठी स्वतःच्या ताकदीवर आणून दाखवा, नाहीतर स्वतःला मर्द म्हणणे, तरी बंद करा, असा टोला त्यांनी सरकारला लगावला आहे.



अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121