नवी दिल्ली : देशव्यापी लसीकरण महोत्सवाचा आज २ रा दिवस आहे. आतापर्यंत देण्यात आलेल्या कोविड १९ प्रतिबंधक लसीच्या एकूण मात्रांनी आज १०.४५ कोटींचा टप्पा ओलांडला आहे. आज सकाळी ७ वाजेपर्यंतच्या अंतरिम अहवालानुसार , १५,५६,३६१ सत्रांच्या माध्यमातून एकत्रितपणे ,१०,४५,२८,५६५ मात्रा देण्यात आल्या. यापैकी ९०,१३,२८९ आरोग्य कर्मचाऱ्यांनी लसीची पहिली मात्रा तर ५५,२४,३४४ आरोग्य कर्मचाऱ्यांनी लसीची दुसरी मात्रा घेतली.
कोरोना विरुद्धच्या लढ्यात आघाडीवर राहून काम करणाऱ्या ९९,९६,८७९ कर्मचाऱ्यांनी (१ ली मात्रा ), आघाडीवर राहून काम करणाऱ्या ४७,९५,७५६ कर्मचाऱ्यांनी (२ री मात्रा ), ६० वर्षांवरील ४,०५,३०,३२१ लाभार्थ्यांनी पहिली मात्रा तर १९,४२,७०५ लाभार्थ्यांनी दुसरी मात्रा घेतली आहे आणि ४५ ते ६० वर्षे वयोगटातील ३,२०,४६,९११ लाभार्थ्यांनी (१ ली मात्रा ) तर ६,७८,३६० लाभार्थ्यांनी (२ री मात्रा ) घेतली आहे. देशात आतापर्यंत देण्यात आलेल्या मात्रांपैकी ६०.१३% मात्रा आठ राज्यात देण्यात आल्या आहेत .
लसीकरण उत्सवाच्या पहिल्याच दिवशी , काल लसीच्या सुमारे ३० लाख मात्रा देण्यात आल्या. देशव्यापी लसीकरण उत्सवाच्या पहिल्याच दिवशी ६३,८०० कोविड प्रतिबंधक लसीकरण केंद्र कार्यरत होती , ही कार्यान्वित असलेल्या कोविड प्रतिबंधात्मक लसीकरण केंद्रांमध्ये झालेली १८,८०० इतकी सरासरी वाढ आहे. खाजगी कार्यस्थळांवर बहुतांश कोविड प्रतिबंधक लसीकरण केंद्र कार्यरत होती. याशिवाय , सामान्यतः लसीकरणाची संख्या कमी असणारा रविवार असूनही , लसीकरण महोत्सवाच्या पहिल्याच दिवशी सुमारे ३० लाख मात्रा देण्यात आल्या.
लसीकरण मोहिमेच्या ८६ व्या दिवशी (११ एप्रिल , २०२१) रोजी , लसीच्या २९,३३,४१८ मात्रा देण्यात आल्या. यापैकी ३८,३९८ सत्रांच्या माध्यमातून २७,०१,४३९ लाभार्थ्यांना लसीची पहिली मात्रा आणि २,३१,९७९ लाभार्थ्यांना लसीची दुसरी मात्रा देण्यात आली. जागतिक स्तरावर दिल्या जाणाऱ्या लसीच्या दैनंदिन संख्येच्या बाबतीत , भारताने दररोज सरासरी ४०,५५,०५५ मात्रा देऊन अव्वल स्थान कायम राखले आहे. ही संख्या काल ३८,३४,५७४ होती.