मुंबई : देशामध्ये सध्या आयपीएलचे वारे वाहू लागले आहेत. एकीकडे कोरोनाचा कहर वाढत असताना दुसरीकडे आयपीएलच्या आयोजनावर अनेकांनी टीका केली. मात्र, असे असूनही आयपीएलचे चाहते मनसोक्त स्पर्धेचा आस्वाद घेत आहेत. अशामध्ये अनेक चाहत्यांनी आपल्या खेळाडूप्रती आपले प्रेम व्यक्त करण्याची परंपरा ही काय भारतीय क्रिकेटमध्ये नवीन नाही. या आशयाचा सध्या एक व्हिडीओ सोशल मिडीयावर वायरल होत आहे. यामध्ये रोहित शर्माचा एक चाहता चक्क त्याची आरती करताना दिसत आहे.
शुक्रवारी झालेल्या आयपीएल सामान्या दरम्यान एक व्हिडिओ सोशल मीडियावर ट्रेंड होत आहे. मुंबई इंडियन्सची फलंदाजी सुरु झाल्यानंतरचा हा व्हिडीओ आहे. रोहित शर्मा फलंदाजीला आलेला पाहताच त्याचा ‘जबरा फॅन’ कमालीचा आनंदी झाला. रोहित शर्मा टीव्हीवर दिसत असल्याने त्याने थेट टीव्हीचीच आरती केली. या व्हिडिओवर मुंबई इंडियन्सच्या चाहत्यांचा भरभरून प्रतिसाद मिळत आहे .