शिवसेनेला बाळासाहेब ठाकरे यांचं नाव घ्यायचा अधिकार नाही- मनसे
मुंबई : विरप्पन नि जेव्हढं लोकांना लुटलं नसेल त्या पेक्षा जास्त सत्ताधार्यांनी महानगरपालिकेला लुटलं आहे. म्हणूनच येणाऱ्या निवडणुकीत विरप्पन गॅंगचा एन्काऊंटर करावाच लागेल असे ट्विट दोन दिवसांपूर्वी मनसे नेते संदीप देशपांडे यांनी केले होते. त्यानंतर आज पत्रकार परिषद घेत मनसेने शिवसेनेचा मुंबईतील कारनामा उघड करत , मुंबईत कायद्याचं राज्य आहे की खंडणीखोरांच असं म्हणत सडकून टीका केली.
मुंबईमध्ये शिवसेनेकडून फेरीवाल्यांकडून खंडणी उकळण केली जातं असल्याचा आरोप मनसे नेते संदीप देशपांडे यांनी आज केला आहे. विक्रोळी या भागात फेरीवाल्यांकडून रोज दहा रुपये घेतले जात आहेत आणि त्याची पावती त्यांना दिली जात आहे त्या पावतीवर बाळासाहेब ठाकरे, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे, यांचे फोटो आहेत तर स्थानिक आमदार सुनील राऊत आणि स्थानिक नगरसेवक उपेंद्र सावंत यांचे ही फोटो आहेत. पोलीस आणि बीएमसी मॅनेज करू अस सांगून ही खंडणी उकळी जात असल्याचा आरोप संदीप देशपांडे यांनी केला. म्हणून यांना विरप्पण गॅंग असं मनसेने म्हटलं होतं आणि काही लोकांना झोम्बलं होत असा टोला ही त्यांनी वरून सरदेसाई यांना लावला.
आमची मागणी आहे की, खंडणीखोरांना चाप बसला पाहिजे. खंडणीखोरांवर कारवाई व्हायलाय पाहिजे. महानगरपालिकेची लोकं कुणी या खंडणी प्रकरणांमध्ये सामिल आहेत का याची उच्चपदस्थ झाली पाहिजे. अशा खंडणीखोरांच्या हातून मुंबई वाचवणे गरजेचे आहे. चंबळखोरांचं राज्य मुंबईत आलंय की काय ? असा प्रश्न मला कधीकधी पडतो. मला सगळ्यात जास्त दु:ख याचं वाटतंय की, या पावतीवर बाळासाहेबांचा फोटो आहे. शिवसेनेला बाळासाहेब ठाकरे यांचं नाव घ्यायचा अधिकार नाही. मुंबई पोलिसांना भेटून यासंबंधीची सविस्तर तक्रार देणार आहे. पोलिसांनी या खंडणीखोरांवर त्वरित कारवाई करावी, अशी मागणी देशपांडे यांनी पत्रकार परिषदेत केली आहे.