भारतीय जनता पक्ष, महाराष्ट्र प्रदेश आयोजित सांस्कृतिक प्रकोष्ठतर्फे स्पर्धेचे आयोजन
नाशिक: भारतीय जनता पक्ष, महाराष्ट्र प्रदेश आयोजित सांस्कृतिक प्रकोष्ठतर्फे मंगळवार, ९ फेब्रुवारी सकाळी ९ वाजता संपूर्ण महाराष्ट्रभर ‘शिवगान स्पर्धा-२०२१’चे आयोजन करण्यात आले होते. नाशिकमध्ये सीएमसीएस महाविद्यालयाच्या सेमिनार हॉलमध्ये उत्तरोत्तर स्पर्धा रंगतदार झाली.
यावेळी भाजप प्रदेश नेते लक्ष्मण सावजी, आ.सीमा हिरे, भाजप शहराध्यक्ष गिरीश पालवे, महापौर सतीश कुलकर्णी यांनी या स्पर्धेबद्दल मनोगत व्यक्त केले व विजेत्या स्पर्धकांचे अभिनंदन केले. स्पर्धेसाठी प्रशांत महाबळ, मोहन उपासनी, रागिणी कामतीकर, आनंद अत्रे, आशिष रानडे, रागेश्री धुमाळ यांनी परीक्षक म्हणून काम पाहिले. नाशिक जिल्हा संयोजक राहुल महाराज साळुंखे यांनी प्रास्ताविक केले. अमोल पाळेकर व नुपूर सावजी यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. तसेच सचिन तिडके यांनी ध्वनिसंयोजन केले.
सदर स्पर्धेमध्ये ५१ वैयक्तिक व १५ सांघिक संघ सहभागी झाले होते. प्रामुख्याने जेम्स स्कूल, शाहिर उत्तम गायकर, नेहा मूर्ती, शिवचैतन्य संघ, शाहीर प्रवीण जाधव आदिंनी विविध प्रकारची शिवगाने सादर केली. यावेळी अलका जांभेकर, नगरसेवक अजिंक्य साने, स्वाती भामरे, वर्षा भालेराव, सोनल दगडे, ललिता बिरारी, प्रतीक शुक्ल, वसंत उशीर, दिगंबर धुमाळ, पंकज भुजंग, पवन उगले, राजेंद्र कोरडे, शिवा जाधव उपस्थित होते.
शिवगान स्पर्धा - २०२१
प्राथमिक फेरी वैयक्तिक
प्रथम क्रमांक : नेहा मूर्ती,
द्वितीय क्रमांक : युवराज शिंदे,
तृतीय क्रमांक : वैभवी सबनीस,
उत्तेजनार्थ : रिया कुलकर्णी, निहार देशमुख
प्राथमिक फेरी सांघिक
प्रथम क्रमांक : शिवगर्जना (जेम्स स्कूल)
द्वितीय क्रमांक : उत्तम गायकर व सहकारी
अंतिम फेरी : शुक्रवार, दि. १९ फेब्रुवारी रोजी शिवजयंती दिवशी अजिंक्यतारा गड, जि. सातारा या ठिकाणी होणार आहे. या बक्षिस वितरण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुनील केदार यांनी केले. राहुल महाराज साळुंखे यांनी प्रास्ताविक व आभारप्रदर्शन केले. बक्षिस वितरण नियोजन व बक्षिस वितरणाचे सूत्रसंचलन महाराष्ट्र प्रदेश सांस्कृतिक आघाडी सहसंयोजक नुपूर सावजी यांनी केले.