मालेगाव बाॅम्बस्फोटात योगी आदित्यनाथांना गोवण्यासाठी मला छळले; 'आरएसएस' नेत्यांनी केली 'ही' मागणी

    29-Dec-2021
Total Views | 182
malegoan _1





नवी दिल्ली - २००८ साली मालेगावमध्ये घडलेल्या बाॅम्बस्फोट प्रकरणातील एका साक्षीदारने दावा केला आहे की, योगी आदित्यनाथ यांना खोटे ठरवण्यासाठी महाराष्ट्र दहशवाद विरोधी पथकाने आपला छळ आणि बळजबरी केली होती. या प्रकरणी माजी पंतप्रधान मनमोहन सिंग आणि काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी माफी मागावी, अशी मागणी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे नेते इंद्रेश कुमार यांनी केली आहे. कुमार म्हणाले की, काँग्रेसच्या नेतृत्वाखालील संयुक्त पुरोगामी आघाडीने (यूपीए) 'भगवा'ला दहशतवादाशी जोडण्याचा कट रचला.

"काँग्रेसच्या नेतृत्वाखालील यूपीएनने (२००८ च्या मालेगाव स्फोटादरम्यान) 'भगव्याविरुद्ध कट रचला. त्याचा दहशतवादाशी संबंध जोडला. त्यांनी धार्मिक नेत्यांची बदनामी करण्यासाठी लोकांना अटक करण्यासाठी (तपास) एजन्सीच्या अधिकार्‍यांचा गैरवापर करण्याचा प्रयत्न केला. परंतु ते अयशस्वी झाले", असे इंद्रेश कुमार एका रेडिओ संदेशात म्हणाले. २००८ च्या मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणातील एका साक्षीदाराने विशेष राष्ट्रीय तपास संस्थेच्या (NIA) न्यायालयासमोर कबुली दिल्यावर कुमार यांचे विधान आले. साक्षीदाराने सांगितले आहे की, त्याला योगी आदित्यनाथ आणि इंद्रेश कुमार यांच्यासह इतर चार आरएसएस नेत्यांची नावे घेण्यास भाग पाडले गेले.


साक्षीदाराने विशेष एनआयए कोर्टात सांगितले की, 'एटीएसने माझा छळ केला होता आणि योगी आदित्यनाथ आणि आरएसएसच्या इतर चार लोकांची खोटी नावे सांगण्यास भाग पाडले. त्याने न्यायालयाला सांगितले की, स्फोटानंतर त्याला सात दिवस मुंबई एटीएस कार्यालयात कोंडून ठेवण्यात आले होते आणि त्यानंतर भाजपचे तत्कालीन खासदार योगी आदित्यनाथ यांचे नाव न घेतल्यास एटीएसने त्याच्या कुटुंबीयांना छळण्याची आणि या प्रकरणात गोवण्याची धमकी दिली होती. या खटल्यातील हा ताजा खुलासा आहे. यापूर्वी किमान १३ साक्षीदारांनी तपास यंत्रणांसमोर केलेले दावे नाकारले आहेत.




अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121