शेणापासून रंगनिर्मिती करत गोशाळांना आर्थिक हातभार!

कराडमधील उद्योजक सतीश बडे यांची अनोखी संकल्पना

    20-Dec-2021
Total Views | 264

karad_1  H x W:
मुंबई (पवन बोरस्ते) : गाय वाचवायची असेल, तर गोशाळा वाचवणे अत्यंत महत्त्वाचे असून त्यासाठी गोशाळांनी उत्पन्नाचे साधन निर्माण करून स्वावलंबी होणे आवश्यक आहे. याच अनुषंगाने गोशाळांना आर्थिक हातभार मिळावा यासाठी सातारा जिल्ह्यातील कराड तालुक्यातील उद्योजक सतीश बडे यांनी शेणापासून पर्यावरणपूरक रंग (पेंट) बनविण्याचा व्यवसाय सुरू केला आहे. महिन्याकाठी पाच ते सहा लाखांची उलाढाल होत असलेल्या या व्यवसायातून अनेकांना रोगजारदेखील प्राप्त झाला आहे.
 
गायींचे महत्त्व परदेशात वाढीस लागत असताना भारतात मात्र, अजूनही गोरक्षणासाठी संघर्ष करावा लागतो. गायींपासून अनेक फायदे आहेत. मात्र, त्याकडे दुर्लक्ष होते. गोशाळांची परिस्थितीही खालावत चालली आहे. त्यामुळेच सतीश बडे यांना गायींच्या शेणापासून ‘ऑरगॅनिक पेंट’ निर्मितीची कल्पना सुचली आणि त्यांनी त्यासाठी प्रयत्नदेखील सुरू केले.
 
शेणाचा पेंट म्हणून कसा वापर करता येईल, याचा वर्षभर अभ्यास करण्यात आला. बऱ्याच प्रयत्नानंतर शेण आणि गोमूत्र वापरून पेंट तयार करण्यात आला. त्यानंतर त्याची ‘नॅशनल टेस्टींग हाऊसमुंबई’ येथे ‘व्होलाटाईल ऑरगॅनिक कंपाऊंड’ अर्थात ‘व्हिओसी’ टेस्ट करण्यात आली. ‘व्हिओसी’ नगण्य असेल, तर ते प्रोडक्टचांगले समजले जाते. त्यामुळे ही टेस्ट अत्यंत महत्त्वपूर्ण मानली जाते. बाकी सर्व ‘केमिकल पेंट’ कंपन्यांचे ‘व्हिओसी’ हे ३०ते ४० टक्क्यांपुढे असतात. मात्र, टेस्टनंतर बडे यांच्या पेंटचा व्हिओसी’ १.९४ ग्रॅम/लिटर इतका आला. त्यामुळे पहिला अडथळा पार पडला.त्यानंतर पुण्यातील ‘कुलकर्णी लॅबोरेटरीज’मध्ये केलेल्या तपासणीत हा ‘ऑरगॅनिक पेंट’ तब्बल सहा ते सात डिग्री तापमान नियंत्रित करत असल्याचे निष्पन्न झाले. पेंट मारल्यावर भितींवरील किटकांचे प्रमाण कमी झाले. तसेच केमिकल पेंटवर शेवाळ देखील वाढले नाही, अशा एक ना अनेक परिक्षणानंतर अखेर हा पेंट बाजारात दाखल झाला. दीड वर्षांच्या प्रतीक्षेनंतर ‘गोरंग वैदिक पेंट’ला येत्या जानेवारी महिन्यात पेटंटदेखील मिळणार आहे.
 
‘टोटल ग्रीन सर्व्हिसेस’ मार्फत प्रोडक्शन सुरू होऊन आता त्याचा व्याप महाराष्ट्रासह भारतातही वाढत आहे. नाशिक, वाशिम, सोलापूर, उस्मानाबाद, सावंतवाडी, कोल्हापूर या जिल्ह्यांसह बिहार, पश्चिम बंगाल, कर्नाटक, केरळ, तमिळनाडूतही या पेंटला चांगली मागणी आहे. या व्यवसायात त्यांना शैलेश सावंत यांचेही मोलाचे सहकार्य मिळत आहे.
 
विशेष म्हणजे, पेंटसाठी आवश्यक शेण गोशाळेतून विकत घेतले जाते. गोशाळेला एक वर्ष शेण साठवून खत तयार केले असता केवळ प्रति एक किलो खतामागे एक रूपया मिळतो. मात्र, सतीश हे गोशाळेला प्रतिकिलो पाच ते सहा रूपये किंमत देतात. त्यामुळे गोशाळांचे आर्थिक उत्पन्नही दुप्पट ते तिप्पट पटीने वाढले आहे.
 
गोशाळा वाचणे आवश्यक
आपले अर्थकारण शेतीवर अवलंबून आहे. त्यामुळे शेतीसंबंधित सर्व गोष्टी वाचवल्या पाहिजेत. गाय प्रचंड उपयुक्त आहे. मात्र, दुर्दैवाने गायींच्या कत्तलीचे प्रमाण वाढले आहे. गाय, गोशाळा वाचवणे आवश्यक आहे. शेणापासून रंगनिर्मिती गोसेवा, गोशाळांना आर्थिक हातभार आणि पर्यावरणसंवर्धन अशा अनेक गोष्टींसाठी उपयुक्त ठरते. गोशाळांबरोबरच पुढील काळात शेतकऱ्यांनाही आमच्या व्यवसायासोबत जोडण्याचा मानस आहे.
- सतीश बडे, संचालक, गोरंग वैदिक पेंट
गायींसाठी चारा आणि अन्य खर्च सुटण्यास मदत
‘ऑरगॅनिक पेंट’ची संकल्पना अतिशय उत्तम आहे. माझ्या गोशाळेतील दररोज ६० किलो शेण विकले जाते. सध्या शेणाला दहा रूपये किलो आणि गोमूत्रालाही ४० ते ५० रू लीटरप्रमाणे भाव मिळत आहे. गायीसंबंधित अनेक गोष्टी व्यवसायासाठी उपयोगात आणता येऊ शकतात, त्यामुळे आणखी गोशाळांना यात समाविष्ट करून घेणे आवश्यक आहे. बडे यांच्या संकल्पनेमुळे शिंदे गोशाळेला अर्थार्जन होत असून उत्पन्नाचा स्त्रोत प्राप्त झाला आहे. गायींसाठी चारा आणि अन्य अत्यावश्यक गोष्टींचा खर्च सुटण्यास त्यामुळे मदत होत आहे.
- दादासो शिंदे, संचालक, शिंदे गोशाळा, मलकापूर
 
 
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121