लस घेतली नाही तर कापणार पगार : गुगल

लस घेतली नाहीतर नोकरीदेखील गमावू शकतात

    15-Dec-2021
Total Views | 74

google_1  H x W
नवी दिल्ली : ओमीक्रॉनचा वाढता धोका लक्षात घेता गुगलने आपल्या कर्मचाऱ्यांना अल्टिमेटम दिला. ज्या कर्मचार्‍यांनी अद्याप लस घेतलेली नाही त्यांनी ती तातडीने घ्यावी, नाहीतर त्यांचे पगार कापले जाऊ शकतात. एवढेच नव्हे तर त्यांना नोकरीही गमवावी लागू शकते. गुगलने कर्मचार्‍यांना त्यांच्या व्हॅक्सीनेशनचा स्टेटस आणि मेडिकल संबंधित कागदपत्रे सादर करण्यासाठी ३ डिसेंबरपर्यंत मुदत दिली होती. आता कंपनीने कर्मचाऱ्यांना लसीकरणाची मुदत १८ जानेवारीपर्यंत वाढवली आहे.
 
 
गुगलने म्हंटले आहे की, जर कोणत्याही कर्मचाऱ्याने ३ डिसेंबरपूर्वी आपले लसीकरण प्रमाणपत्र अपलोड केले नाही तर ते त्यांच्याशी संपर्क साधण्यास सुरुवात करतील. त्यानंतर त्यांना लसीकरण करण्यासाठी १८ जानेवारीपर्यंत वेळ देण्यात येणार आहे. तरीही त्यांनी तसे न केल्यास त्यांना ३० दिवसांच्या सशुल्क प्रशासकीय रजेवर ठेवण्यात येईल. यानंतर, त्यांना ६ महिन्यांसाठी विनावेतन वैयक्तिक रजेवर ठेवले जाईल. त्यानंतरही त्यांनी लसीकरण न केल्यास त्यांचा कार्यकाळ संपणार आहे.
 
 
अग्रलेख
जरुर वाचा
चैरेवेति चैरेवेति मंत्राचे मूर्तिमंत उदाहरण ; प्रमिलताई मेढे

चैरेवेति चैरेवेति मंत्राचे मूर्तिमंत उदाहरण ; प्रमिलताई मेढे

राष्ट्र सेविका समिती’च्या केंद्रीय कार्यालय प्रमुख, अखिल भारतीय कार्यकारी, जागतिक विभाग प्रमुख, सह-कार्यवाहिका (२००३ ते २००६) आणि प्रमुख संचालिका (२००६ ते २०१२) अशा विविध जबाबदार्‍या प्रमिलताईंनी यशस्वीरित्या सांभाळल्या. त्यांनी देशभरात आणि परदेशातही प्रवास केला, ज्यात श्रीलंका, केनिया, युनायटेड किंग्डम, अमेरिका इत्यादी देशांचा समावेश आहे. अमेरिकेतील प्रवासादरम्यान त्यांना न्यू जर्सीचे मानद नागरिकत्वही मिळाले होते. २०२० साली ‘एसएनडीटी’ विद्यापीठाने त्यांना ‘डी. लिट’ ही मानद पदवी प्रदान करण्यात आली...

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121