क्रूझ ड्रग्ज पार्टीमागे सुनील पाटील मास्टरमांईड

भाजप नेते मोहित भारतीय यांचा दावा

    06-Nov-2021
Total Views |
Mohit bhartiya_1 &nb
मुंबई : मुंबईतील क्रूझ ड्रग्ज पार्टी प्रकरणात आरोप-प्रत्यारोप सुरू असताना आता यामध्ये भाजप नेते मोहित भारतीय यांनी आणखी एक दावा केला आहे. या सर्व प्रकरणात सुनील पाटील नावाचा व्यक्ती मास्टरमाईंड असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. आपल्या दाव्याच्या समर्थनार्थ मोहीत भारतीय यांनी सुनील पाटील आणि सॅम डिसूजा यांच्यात झालेल्या व्हॉट्सअॅप संभाषणाचे स्क्रीनशॉट देखील पत्रकार परिषदेत ठेवले.
 
 
 
यावेळी मोहित भारतीय म्हणाले की, "गेल्या महिन्यापासून एक प्रकरण गाजत आहे. ते म्हणजे आर्यन खान प्रकरण. २ तारखेला अटक झाली आणि ३ तारखेला त्याला रिमांड मिळाला. त्यानंतर ६ तारखेला पत्रकार परिषद घेऊन एका मंत्र्याने भाजप, एनसीबीवर आरोप केले. या सर्वांच्या मागची कहाणी मी पुराव्यांसह सादर करत आहे. या सर्व गोष्टींचा मास्टरमाईंड सुनिल पाटील आहे. गेल्या २० वर्षांपासून सुनील पाटील राष्ट्रवादीच्या संपर्कात होता." पुढे त्यांनी सांगितले की, "सुनील पाटील हा राष्ट्रवादी काँग्रेसचा माणूस आहे. सुनील पाटील हा राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांचा मुलगा ऋषिकेश देशमुख याचा खास मित्र आहे. सुनील पाटील हा बदल्यांचे रॅकेट चालवत होता. सुनील पाटील याचे महाविकास आघाडी सरकारमधील अनेक मंत्र्यांसोबत जवळचे संबंध आहेत."
 
 
मोहित भारतीय यांनी यावेळेस असा दावा केला की, किरण गोसावी हा सुनील पाटील यांचा माणूस आहे. सुनील पाटील यांनी किरण गोसावींचा संपर्क सॅम डिसूझाला दिला होता. इथे हा प्रश्न निर्माण होतो, की राष्ट्रवादीने सुनील पाटीलला पुढे करत हे का केले?, कोण मंत्री आहे जे हे सगळे करत आहेत? खूप वरिष्ठ नेता आहे, मी त्यांच्यावर आरोप लावत नाही पण त्यांना हे सांगावे लागले की, त्यांच्या लोकांचे, मंत्र्यांचे पक्षाचे या व्यक्तींशी काय संबंध आहेत?
 
 
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121