‘पार्क’ शिष्टमंडळातर्फे ‘रिलायन्स फ्रेश’, ‘बिग बास्केट’सह ५ कंपन्या सहभागी
नवी दिल्ली : जम्मू-काश्मीरमध्ये प्रशासनातर्फे यंदा प्रथमच सफरचंद महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. त्याचे उद्घाटन गुरुवार, दि. २८ ऑक्टोबर रोजी केंद्रीय कृषिमंत्री नरेंद्रसिंह तोमर आणि नायब राज्यपाल मनोज सिन्हा यांच्या हस्ते झाले. विशेष म्हणजे, या महोत्सवाच्या आयोजनामध्ये ‘विवेक व्यासपीठ’ संचलित ‘पॉलिसी अॅडव्होकसी रिसर्च सेंटर’ अर्थात ‘पार्क’चा सक्रिय सहभाग आहे.जम्मू-काश्मीर प्रशासनातर्फे प्रदेशातील सफरचंद उत्पादन वाढविणे, सफरचंद राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमध्ये पाठविणे, उत्पादन वाढविण्यासाठी शेतकर्यांना नवे तंत्रज्ञान उपलब्ध करून देणे यासाठी विविध योजना राबविण्यात येत आहे. सफरचंद उत्पादक शेतकर्यांना नवे तंत्रज्ञान उपलब्ध करून देण्यासाठी ‘पार्क’ जम्मू-काश्मीरच्या ‘हॉर्टिकल्चर’ विभागासोबत कामदेखील करीत आहे.
‘हॉर्टिकल्चर’ विभागातर्फे दि. २८ आणि २९ ऑक्टोबरदरम्यान आयोजित पहिल्या सफरचंद महोत्सवाच्या आयोजनामध्येही ‘पार्क’ची महत्त्वाची भूमिका आहे. ‘पार्क’तर्फे या महोत्सवामध्ये ‘रिलायन्स फ्रेश’च्या उत्तर विभागाचे (दिल्ली) प्रोक्युरमेंट मॅनेजर ......, बंगळुरू येथील ‘बिग बास्केट’चे प्रोक्युरमेंट मॅनेजर ......, मुंबई येथील ‘सेव्हनस्टार फ्रुट्स प्रायव्हेट लिमिटेड’चे मार्केटिंग आणि प्रोक्युरमेंट मॅनेजर ......, ‘आयटीसी’चे ऑपरेशन्स मॅनेजर ‘पार्क’च्या शिष्टमंडळातर्फे महोत्सवात दाखल झाले आहेत. यामध्ये सफरचंद उत्पादक शेतकर्यांकडून थेट सफरचंद आणि संबंधित उत्पादने खरेदी करण्याविषयी सविस्तर चर्चा होणार आहे. ‘पार्क’च्या ‘नेटवर्क डेव्हलपमेंट अॅण्ड स्ट्रॅटेजिक अलायन्सेस हेड’ रुचिता राणे यांच्या नेतृत्वाखाली ‘पार्क’ने या महोत्सवामध्ये सहभाग घेतला आहे.
सफरचंद उत्पादनामध्ये जम्मू-काश्मीर महत्त्वाचे ः कृषिमंत्री तोमर
“देशातील एकूण सफरचंद उत्पादनापैकी तब्बल ८७ टक्के उत्पादन हे जम्मू-काश्मीरमध्ये होते. त्यामुळे सफरचंद उत्पादनासाठी जम्मू-काश्मीर हे अतिशय महत्त्वाचे आहे,” असे प्रतिपादन केंद्रीय कृषिमंत्री नरेंद्रसिंह तोमर यांनी केले. “सफरचंद उत्पादनामध्ये वाढ करून राज्यातील जनतेचा विकास साध्य करण्यासाठी जम्मू-काश्मीर प्रशासनास केंद्र सरकार सर्वतोपरी मदत करणार,” असेही तोमर यांनी यावेळी सांगितले. शेतकर्यांचे उत्पन्न दुप्पट करणार ः नायब राज्यपाल सिन्हा
जम्मू-काश्मीरमधील अधिकांश रहिवासी हे शेतीवर अवलंबून आहेत. त्यामुळे प्रदेशाच्या विकासात कृषिक्षेत्राचा मोठा वाटा असल्याचे नायब राज्यपाल मनोज सिन्हा यांनी सांगितले. प्रदेशातील शेतकर्यांचे उत्पन्न दुप्पट करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जात असल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले.