पीएमआरडीएची निवडणूक बिनविरोध होण्यासाठी राजकीय पक्षांच्या हालचाली सुरू

एकूण ३० जागांसाठी १०६ अर्ज

    25-Oct-2021
Total Views | 94

पीएमआरडीए _1  H
 
 
 

पुणे : पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (पीएमआरडीए) नियोजन समितीच्या सदस्य पदासाठी निवडणूक बिनविरोध व्हावी याकरता पुण्यातील सर्वच राजकीय पक्षांच्या हालचाली सुरू आहेत. पुणे महानगर विकास प्राधिकरणाच्या नियोजन समितीच्या सदस्य पदाच्या ३० जागांसाठी एकूण १०८ उमेदवारांचे अर्ज पात्र ठरले आहेत.

यातील महापालिका गटातील २२ नगरसेवकांना चार महिन्यांचीच मुदत मिळणार आहे; त्यामुळे ही महापालिका गटातील निवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी पुण्यातील विविध राजकीय पक्षांचे प्रयत्न सुरु आहेत. उमेदवारी अर्ज माघारी घेण्याचा सोमवार हा शेवटचा दिवस असल्यामुळे सोमवार नंतरच ह्या निवडणुकीचे चित्र स्पष्ट होणार आहे. पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या (पीएमआरडीए) महानगर नियोजन समितीच्या निवडणुकीसाठी तीन क्षेत्र आहेत.

मोठ्या नागरी क्षेत्रात पुणे व पिंपरी-चिंचवड महापालिकेचा समावेश होतो. या क्षेत्रातून नगरसेवकांमधून २२ सदस्य निवडून द्यायचे आहेत. या २२ जागांसाठी २७ उमेदवारांनी अर्ज भरले आहेत. लहान नागरी क्षेत्रात नगरपरिषदेचा समावेश आहे ;यामध्ये एक जागा असून ६ उमेदवारांनी अर्ज भरले आहेत. तर ग्रामीण क्षेत्रातील ७ जागांसाठी ७५ उमेदवारांनी अर्ज भरले आहेत.

पीएमआरडीएचा विकास आराखडा प्रसिध्द झाला असून त्यावर नागरिकांच्या हरकती सुध्दा नोंदविल्या जात आहेत. त्यामुळे या समितीवर जाऊन काम करण्याची इच्छुकांची संख्या मोठी आहे. या निवडणुकीत पुणे आणि पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेचे २८५, तर नगरपरिषदांचे ११४ आणि ग्रामीण भागाचे ५८० मतदार मतदान करणार आहेत.

 
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121