अभिमानास्पद ! हायपरसॉनिक तंत्रज्ञान असणाऱ्या काही देशांमध्ये भारताचाही समावेश

पाकिस्तान भयभयीत

    24-Oct-2021
Total Views | 156

india_1  H x W:




वॉशिंग्टन :
हायपरसोनिक शस्त्रे विकसित करणाऱ्या काही निवडक देशांमध्ये भारताचा समावेश आहे, असे एका स्वतंत्र  अमेरिकन कॉंग्रेसच्या अहवालात म्हटले गेले आहे, ज्यामध्ये दावा करण्यात आला आहे की चीनने अलीकडेच अणु-सक्षम हायपरसोनिक क्षेपणास्त्राची चाचणी केली ज्याने आपले लक्ष्य गमावले असले तरी क्षेपणास्त्राने जगभर प्रदक्षिणा घातली.या क्षेपणास्त्राच्या अंतराळ क्षमतेने अमेरिकन गुप्तचरांनाही आश्चर्यचकित केले होते.स्वतंत्र कॉंग्रेसनल रिसर्च सर्व्हिस (सीआरएस) ने या आठवड्यात एका अहवालात म्हटले आहे की अमेरिका, रशिया आणि चीनकडे अतिप्रगत हायपरसोनिक शस्त्र आहेत, ऑस्ट्रेलिया, भारत, फ्रान्स, जर्मनी आणि जपानसह इतर अनेक देश देखील यात आहेत जे हायपरसोनिक शस्त्रे तंत्रज्ञान विकसित करत आहेत.




ऑस्ट्रेलियाने अमेरिकेसोबत सहकार्य केले आहे, तर भारताने रशियासोबत सहकार्य केले आहे, असे सीआरएसने आपल्या अहवालात म्हटले आहे. 'ब्रह्मोस २' या हायपरसोनिक क्रूझ क्षेपणास्त्राच्या विकासासाठी भारताने रशियासोबत सहकार्य केले आहे, असे त्यात म्हटले आहे.




सीआरएसने म्हटले आहे की, "भारत आपल्या हायपरसॉनिक टेक्नॉलॉजी डेमॉन्स्ट्रेटर व्हेईकल प्रोग्रामचा एक भाग म्हणून स्वदेशी, दुहेरी-सक्षम हायपरसोनिक क्रूझ क्षेपणास्त्रसुद्धा विकसित करत आहेत आणि जून २०१९ आणि सप्टेंबर २०२० मध्ये मॅक ६ मध्य स्क्रॅमजेटची यशस्वी चाचणी केली आहे."यापूर्वी फायनान्शिअल टाईम्सने वृत्त दिले होते की, चीनने हायपरसॉनिक क्षेपणास्त्राची चाचणी केली आहे.




भारताच्या या प्रगतीमुळे पाकिस्तान घाबरले आहे आणि आम्ही कोठूनही वेळ पडली तर हात पसरून 'हायपरसॉनिक टेक्नॉलॉजी' आमच्या देशात आणू अन्यथा भारत पाकिस्तनावर या शस्त्राने आक्रमण करून क्षणात आमचा देश नष्ट करू शकतात असे पाकिस्तानचे अधिकारी बावळू लागले आहेत.






अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121