.पुणे: पुणे महानगरपालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाच्या वतीने प्लास्टिक कचऱ्याबाबत जनजागृती आणि स्वछतेसाठी आयोजित केलेल्या पुणे मेयर प्लॉग-ए- थोन उपक्रमास चांगला प्रतिसाद मिळाला. या उपक्रमात चालत चालत कचरा उचलणे तसेच नागरिकांमध्ये आरोग्य आणि स्वछ्तेबाबत जागरूकता निर्माण करणे हे प्रकार होते.
औंध परिसरात एल्फिस्टन रास्ता, पुणे-मुंबई रस्ता,डॉ.बाबासाहेब.आंबेडकर चौक ते सायप्रस महाविद्यालय, पुणे विद्यापीठ ते पाषाण सर्कल, पाषाण ते सुसगाव रस्ता या भागात पुणे मेयर प्लॉग-ए-थोन उपक्रम राबविला गेला.तर औंध सारखाच उंड्री या भागात पण प्लॉग-ए-थोन या उपक्रमास चांगला प्रतिसाद मिळाला.
या वेळेज पुणे शहराच्या उप-महापौर सुनीता वाडेकर, पीएमपील चे अध्यक्ष व संचालोक प्रकाश ढोरे, नगरसेविका ज्योती कळमकर,महाराष्ट्र राज्य भाजपा वैद्यकीय आघाडीच्या प्रदेश सहसंयोजक डॉ. तेजस्विनी अरविंद गोळे, पुणे महानगरपालिकेचे स्वछता कर्मचारी व पर्यावरणाविषयक काम करणारे स्वयंसेवक देखील उपस्थित होते. उपक्रमाची सांगता परिसर व देश स्वच्छ ठेवण्याची शपथ घेऊन करण्यात आली.