मुंबई, दि. २२ (प्रतिनिधी) : ठाकरे सरकार मधील ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या बद्दल केलेल्या अपमानजनक ट्विट विरोधात भाजप कार्यकर्त्यांच्या वतीने दादर येथे शुक्रवार, दि.22 ऑक्टोबर रोजी आंदोलन करत निदर्शने करण्यात आली.
आंदोलनकारी भाजप कार्यकर्त्यांना पोलिसांनकरवी अटक करण्यात आली. यावेळी जिल्हा महामंत्री नीरज उभारे, विलास आंबेकर, नगरसेविका राजेश्री शिरवडकर, मुंबई सचिव मणी बालन, जिल्हा उपाध्यक्ष गजेंद्र धुमाळ, वडाळा अध्यक्ष विजय डगरे, निलेश नायकर महामंत्री, जिल्हा युवा अध्यक्ष अजित सिंग, वडाळा युवा अध्यक्ष अमोल गायकवाड, स्वप्ना बालन,नितीन कदम, अबू खान, संदीप पाणसंडे, आणि असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.