हिंदूंचे शिर उडवा!: हिंसेपूर्वी बांग्लादेशच्या मौलवीनं ओकली गरळ

कोरोनामुळे ५० कोटी भारतीय मरावेत म्हणून केली होती दुआ

    19-Oct-2021
Total Views | 596

Furfuraa _1  H




नवी दिल्ली
: पश्चिम बंगालमध्ये सुरू असलेल्या हिंदू अल्पसंख्यांकाविरोधातील हिंसाचारामुळे देशभरात अशांतता आहे. वादग्रस्त फुरफुरा शरीफचे मौलवी आणि इंडियन सेक्युलर फ्रंटचे (आईएसएफ) संस्थापक पीरजादा अब्बास सिद्दीकी यांनी पुन्हा एकदा वादग्रस्त विधान केले आहे. कट्टरपंथी मौलवीने बांग्लादेशमध्ये दुर्गा पूजेवेळी कथित स्वरुपात कुराण ठेवणाऱ्याचे मुंडके छाटले जावे, असा आदेश दिला आहे.
 
 
भडकाऊ भाषण देणाऱ्या पीरजादा अब्बास सिद्दीकीचा हा व्हीडिओ व्हायरल होत आहे. त्यात बंगालीत त्याने आपला संदेश दिला आहे. सिद्दीकी म्हणतो, "जे लोक बांग्लादेशमध्ये दुर्गा पूजा मंडळात देवीच्या चरणी कुराणची प्रत ठेवतात. जर कुणाला हनुमान चालीसा पठण करायचा असेल तर त्याचे मुंडके उडवले पाहीजे"
 
 
सिद्दीकीने हे भडकाऊ भाषण शुक्रवारी पश्चिम बंगालच्या २४ परगणा राज्यात दिले होते. अब्बास सिद्दीकीने युवकांना दुर्गा पूजेत सहभागी होण्यावरून सुनावले होते. तो म्हणाला, "मला माहिती आहे की, काही वर्षांपूर्वी दुर्गा पूजेच्या मंडळाची थीम (सौदी अरेबियातील इस्लामिक प्रार्थनास्थळ) काबा, अशी साकारण्यात आली होती. जर काबा इतकेच आवडते तर ते इस्लाम धर्म का स्वीकारत नाहीत, असा प्रश्न त्याने विचारला.
 
 
सिद्दीकी म्हणाला, "कुराणचा अवमान करण्याचा हक्क त्यांना आहे तर त्यांचे मुंडके छाटण्याचाही मला अधिकार आहे." या प्रकरणी सध्या चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत. भाजप नेता तरुण ज्योति तिवारी यांनीा कोलकाता पोलीसांत सिद्दीकीची तक्रार दाखल केली आहे. हिंदूंचे शीर छाटण्याची आणि प्रभू श्री हनुमानाचा अवमान करणारं वक्तव्य त्याने केले आहे.
 
 
नेमकं प्रकरण काय ?

काही दिवसांपूर्वी बांग्लादेशच्या कॉमिला जिल्ह्यात ननुआ दिघी येथे दुर्गा पूजा मंडळात मोहल्ल्यातील जमावाने येऊन तोडफोड केली. याबद्दल असेही म्हटले जात आहे की, ज्या फोटोमुळे हा सर्व प्रकार घडला तो सर्व एडीट केलेला होता आणि हिंसाचार घडविण्यासाठी जाणून बुजून व्हायरल करण्यात आला होता.
 
 
कोरोनामुळे भारतात ५० कोटी लोक मरू दे!


सिद्दीकी अशी वक्तव्ये करण्यासाठी पूर्वीपासूनच करत आला आहे. कोरोना महामारीमुळे लोक मृत्यूमुखी पडावीत, अशी दुआ त्याने केली होती. अल्लाह माझी दुआ मान्य करेल, असा त्याला विश्वास असा. संपूर्ण भारतात असा विषाणू पसरूदे की, १०-२० नव्हे तर २५-५० कोटी लोकांचा मृत्यू व्हावा, असे वक्तव्य त्याने केले होते. पुढे तो म्हणाला, "मी काही चुकीचं बोलतोयं का?, आनंद झाला हे ऐकून. त्यानंतर तिथे उपस्थित जनसमुदायानेही टाळ्या पिटल्या होत्या."









अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121