परमबीर सिंहाच्या विरोधात लुक आऊट नोटीस; देश न सोडण्याचा आदेश

    01-Oct-2021
Total Views | 79
parambir singh _1 &n




मुंबई -
मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांच्याविरोधात लुकआऊट नोटीस जारी करण्यात आली आहे. ही माहिती देताना महाराष्ट्राचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी म्हटले आहे की, परमबीर सिंग यांच्या देशातून पळून जाण्याबाबत मिळालेल्या माहितीनंतर हे पाऊल उचलण्यात आले आहे.
 
 
 
सिंह यांनी देश सोडल्याची माहिती आहे, असे वळसे यांनी गुरुवारी एका कार्यक्रमाच्या वेळी सांगितले. मात्र त्याबद्दल कोणतीही ठोस माहिती मिळालेली नाही. सरकारी अधिकारी म्हणून त्यांच्यावर परदेशी प्रवास करण्यासाठी निर्बंध आहेत. सरकारच्या परवानगीशिवाय सिंह हे देश सोडू शकत नाही. तरीही ते गेले असतील, तर ते बरोबर नाही, असे वळसे म्हणाले.
 
 
 
वळसे यांनी सांगितले की, राज्य सरकारही परमबीर सिंगचा शोध घेण्यासाठी केंद्राच्या संपर्कात आहे. तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर मुंबईच्या माजी पोलिस आयुक्तांनी भ्रष्टाचाराचा आरोप केला होता. सीबीआय आणि ईडी आयपीएस अधिकाऱ्याने लावलेल्या आरोपांची चौकशी करत आहेत. मुंबई पोलीस आयुक्तपदावरून काढून टाकल्यानंतर आणि होमगार्डला बदली केल्यानंतर परमबीर सिंह यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लिहिलेल्या पत्रात आरोप केला होता की देशमुख यांनी मुंबईतील पोलीस अधिकाऱ्यांना वसुलीचे लक्ष्य दिले आहे.
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121