महाराष्ट्रात कोरोना लसीकरणाचं ड्राय रन सुरु

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    08-Jan-2021
Total Views |

dry run_1  H x



मुंबई :
केंद्र सरकारच्या आदेशानुसार राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये ड्राय रनचे आयोजन करण्यात येत आहे, अशी माहिती आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे. महाराष्ट्रात २ जानेवारील पुणे, नागपूर, जालना, नंदूरबारमध्ये ड्राय रन पार पडले होते. त्यानंतर आज पुन्हा म्हणजेच ८ जानेवारी रोजी महाराष्ट्राच्या ३० जिल्हे आणि २५ महापालिका क्षेत्रांमध्ये आज कोरोना लसीकरणाचं ड्राय रन केले जात आहे.


प्रत्येक जिल्ह्यामध्ये तीन, तर प्रत्येक महापालिका क्षेत्रात एका आरोग्य संस्थेत ड्राय रन घेण्यात येणार आहे. मुंबईतील कूपर रुग्णालयात 'ड्राय रन'ला सुरूवात झाली आहे. तर, ठाणे जिल्हा शासकीय रुग्णालयात लसीकरणाची 'ड्राय रन' घेण्यात येत आहे. ड्राय रननंतर देशात लसीकरणाचा प्रत्यक्ष कार्यक्रम पुढील आठवड्यापासून सुरु होण्याची शक्यता आहे. आरोग्य मंत्रालयाने ५ जानेवारीला सांगितलं होतं की, कोरोना लसीला मंजुरी मिळाल्यानंतर लसीकरणाचा कार्यक्रम १० दिवसांनी सुरु होऊ शकतो. कोरोना लसीच्या आपत्कालीन वापरासाठी DCGI ने ३ जानेवारीला भारत बायोटेकच्या कोवॅक्सिन आणि सीरम इन्स्टिट्यूटच्या कोविशील्ड लसीला परवानगी दिली होती. त्यामुळे १३ किंवा १४ जानेवारीपासून देशात कोरोना लसीकरणाचा कार्यक्रम सुरु होऊ शकतो.


कोरोनाच्या दोन लसींना देशात मान्यता मिळाली आहे. काही दिवसाता लसीकरण मोहीम देखील सुरु होईल. मात्र कोरोनाची लस मोफत मिळणार की पैसे लागणार हा प्रश्न अनुत्तरित आहे. कोरोना लसीकरणासाठी लागणार खर्च हा केंद्र सरकारने करायला हवा अशी मागणी राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केली आहे. शिवाय एका राज्यात एकाच कंपनीच्या लसीकरणाला मान्यता द्यावी अशी मागणीही त्यांनी केली आहे. लसीकरणासाठीच्या कोल्ड चैन आणि लागणाऱ्या मनुष्यबळाचा खर्च केंद्र सरकारने द्यावा अशी अपेक्षा राजेश टोपे यांनी व्यक्त केली. दरम्यान पहिल्या टप्प्यातील लसीकरणाचा पहिला डोस अंदाजे अडीच महिन्यात पूर्ण होऊ शकेल असा अंदाज त्यांनी व्यक्त केला आहे.


महाराष्ट्रात सध्या दिवसाला २ ते ३ हजार नवीन रुग्ण आढळतत आहेत. राज्यात काही दिवसांपूर्वी दर दिवशी २५ ते ३० हजार रुग्ण आढळत होते. महाराष्ट्राचा रिकव्हरी रेट ९६ टक्के आहे. कोरोनाच्या नव्या अवताराबाबत आम्ही सतर्क आहोत. महाराष्ट्र हे पहिलं राज्य आहे ज्यांनी ब्रिटनहून आलेल्या विमानांमधून येणाऱ्या प्रवाशांना संस्थात्मक क्वॉरंटाईन करण्याचा निर्णय घेतला.आम्ही आमच्या प्रोटोकॉलनुसार अंमल बाजावणी कायम ठेवणार, तसे आम्ही केंद्राशी पत्र व्यवहारकरून इतर राज्यात देखील प्रोटोकॉल कायम राहावे, यासाठी सांगण्यात येणार जेणेकरून इतर राज्यातून आपल्या राज्यात रूग्ण संख्या वाढू नये,असं राजेश टोपे म्हणाले.
@@AUTHORINFO_V1@@